भन्नाटच! कुत्र्याने वाचविला मुलीचा जीव! | पुढारी

भन्नाटच! कुत्र्याने वाचविला मुलीचा जीव!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्याचमुळे त्याचे आणि माणसाचे नाते अनादी काळापासून निकटचे राहिले आहे. माणूस सर्वाधिक प्रेम कुत्र्यावर करत असून, सर्वांची सुरक्षा घेण्याचे कामही तो करत असतो. जीवाची पर्वा न करता कुत्रा आपल्या सर्वांची रक्षा करतो.

आता एका कुत्र्याच्या धाडसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक मुलगी एकटीच रस्त्यावरून जाताना दिसत आहे. याचदरम्यान एक कारचालक तेथे येतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो. त्या मुलीचे अपहरण करण्याचा त्या कारचालक डाव असतो; पण त्याठिकाणी जीवरक्षक म्हणून कुत्रा त्याठिकाणी धावून येतो आणि भुंकून त्या कारचालकाला पळवून लावतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकरी त्या कुत्र्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. एक्सवरील हा व्हिडीओ आतापर्यंत 15 दशलक्ष लोकांनी पाहिला असून, त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

कुत्रे खूपच प्रामाणिक असतात, वेळ पडल्यानंतर आपला प्राणही वाचवतात अशी एकाने, तर कुत्र्याने मुलीचे प्राण वाचवून धैर्याचे काम केले असल्याची प्रतिक्रिया दुसर्‍या एकाने केली दिली आहे.

Back to top button