World’s oldest dog Died : जगातील सर्वात वृद्ध श्वानाचे निधन | पुढारी

World's oldest dog Died : जगातील सर्वात वृद्ध श्वानाचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात वृद्ध श्वानाचे निधन झाले. तो ३१ वर्ष १६५ दिवसांचा होता. त्याच नाव बॉबी हाेते. तो पोर्तुगालमध्ये लिओनेल कोस्टा यांच्या घरी राहत होता. तो राफेरो अलेन्तेजानो प्रकारातील होता. त्याने २९ वर्षे, पाच महिने जगलेल्या श्वानाचा विक्रम मोडला आहे, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सोमवारी (दि.२३) सांगितले. (World’s oldest dog Died )

मध्य पोर्तुगालमधील लीरिया प्रांतातल्या कॉनकिरोज शहरातल्या एका गावात लिओनेल कोस्टा यांच्या घरी राफेरो अलेन्तेजानो प्रकारातील एक श्वान पाळला होता. तो अलिकडेच मृत पावला. तो जगातील वृद्ध श्वान ठरला. तो ३१ वर्ष १६५ दिवस जगला असून, त्याने २९ वर्षे, पाच महिने जगलेल्या ऑस्ट्रेलियन  श्वानाचा ८४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलिनय कॅटल डॉग ब्लुईच्या नावे होता. या श्वानावर १९३९ पासुन विक्रम होता. असे सोमवारी (दि.२३) गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सांगितले. पारंपारिकपणे मेंढी कुत्रे म्हणून वापरल्या जाणार्‍या बोबीच्या जातीचे आयुर्मान साधारणपणे १२ ते १४ वर्षे असते.

World’s oldest dog Died : दीर्घायुष्य राहण्याचे श्रेय

बाॅबी श्‍वानाचे मालक लिओनेल कोस्टा यांनी त्याच्या दीर्घायुष्याचे श्रेय ग्रामीण भागात शांततेत राहणे, कधीही साखळदंडाने किंवा पट्ट्याने बांधलेले नाही, नेहमी मानवी अन्न खाणे यासह अनेक घटकांना श्रेय दिले.

हेही वाचा 

Back to top button