गौरवास्पद..! भारतीय वंशाच्या लेखिका नंदिनी दास यांना ब्रिटिश ॲकॅडमीचा पुरस्कार | पुढारी

गौरवास्पद..! भारतीय वंशाच्या लेखिका नंदिनी दास यांना ब्रिटिश ॲकॅडमीचा पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : British Academy Book Prize भारतीय वंशाच्या लेखिका नंदिनी दास यांना या वर्षीचा ब्रिटिश ॲकडमी बुक प्राईज हा पुरस्कार मिळाला आहे. ‘नॉनफिक्शन’ प्रकारातील पुस्तकांसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. Courting India : England, Mughal India and the Origins of Empire या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार ब्रिटनमधील अत्यंत सन्मानचा मानला जातो.  (Nandini Das 2023 British Academy Book Prize)

नंदिनी दास या ब्रिटनस्थित आहेत. त्यांचे हे पहिले पुस्तक आहे. मंगळवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशांनी मुघल दरबारात पाठवलेल्या दूतांच्या अनुषंगाने हे पुस्तक लिहिले आहे. नंदिनी दास या ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्रजी विभागात प्राध्यापक आहेत.

उच्च संशोधन आणि समृद्ध भाषाशैली Nandini Das 2023 British Academy Book Prize

१७व्या शतकात ब्रिटिशांचे पहिले राजदूत सर थॉमस रो भारतात आले होते. भारतातील ब्रिटिश सत्तेची पायभरणी कशी होत गेली यावर या पुस्तकातून नवा प्रकाश टाकण्यात आला आहे. हा पुस्तकासाठी दास यांनी बरेच नवे संदर्भ शोधले आहेत, त्यातून बरेच गैरसमज खोडूनही काढले आहेत, असे या पुरस्कारासाठीचे परीक्षक चार्लस ट्रिप यांनी म्हटले आहे.

“ब्रिटिशांची महत्त्वाकांक्षा, त्यातून भारत आणि ब्रिटिन यांच्यातील संबंध कसे घडत गेले आणि मुघल दरबारातील चढउतारांवर कसे परिणाम होत गेले याचीही माहिती या पुस्तकातून मिळते,” असे ट्रिप म्हणाले. अतिशय समृद्ध भाषाशैली आणि उच्च संशोधन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. British Academy Book Prize  हा पुरस्कार २०१३पासून नॉनफिक्शन प्रकारातील पुस्तकांतील हा पुरस्कार दिला जातो.

हेही पाहा

Back to top button