

पुढारी ऑनलाइन डेस्क : National Education Policy : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (29 जुलै) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय 'अखिल भारतीय शिक्षा समागम 2' कार्यक्रमाचे दिल्ली येथे उद्घाटन करतील. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विविध विषयांवरील तयार केलेली 12 भारतीय भाषांमधील 100 पुस्तके प्रकाशन करणार आहेत. यामध्ये विज्ञान, मानविकी आणि सामाजिक विज्ञान याविषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. अमर उजालाने याचे वृत्त दिले आहे.
युजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांनी सांगितले की, शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीच्या प्रगती मैदानात दोन दिवसीय शिखर सम्मेलन आयोजित करत आहे. याला अखिल भारतीय शिक्षा समागम असे नाव दिले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सम्मेलनाचे उद्घाटन करतील. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते भारतीय भाषांतील 100 पुस्तके लाँच करण्यात येईल. National Education Policy
तसेच यावेळी तंत्रज्ञान, कौशल्य विकास, इनोवेशन रिसर्च इत्यादींमध्ये झालेल्या बदलांवर आधारित प्रदर्शनी जी नव्या भारताचे दर्शन घडवते त्याचेही यावेळी पंतप्रधान उद्घाटन करतील. प्राध्यापक कुमार म्हणाले, प्रोफेसर कुमार यांनी सांगितले की, अभियांत्रिकीच्या धर्तीवर या वर्षापासून अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांनाही भारतीय भाषांमध्ये शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याची काही पुस्तके तयार आहेत तर काही अनुवादाच्या प्रक्रियेत आहेत. शिकणारे हे NEP चा गाभा आहेत आणि त्याच्या शिफारशींचा त्यांना थेट फायदा होईल.
जगदीश कुमार यांनी पुढे सांगितले की, आगामी शैक्षणिक सत्र 2023-2024 पासून सर्वच विश्वविद्यालयांमध्ये चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पदवीसह अन्य कोणत्याही आवडीच्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या वेळेनुसार शिक्षण घेता येईल. याशिवाय कौशल्य विकास, स्टार्ट अप, इनोवेशन, रिसर्च, इंटर्नशिप व प्लेसमेंटमध्ये जाऊन नोकरीसाठी विकल्प मिळेल. थोडक्यात विद्यार्थी आपली प्रतिभा आणि रुचिनुसार शिक्षण आणि करियरसाठी विकल्पाचा मार्ग स्वतःच निवडू शकतो. पदवीसोबत आपल्या आवडत्या विषयाचा देखील अभ्यास करू शकतो.
नवीन शैक्षणिक धोरणात पुस्तकी ज्ञान आणि वर्गातील ज्ञानासह व्यावहारिक आणि प्रयोगशाळेतील गुण, इनोवेशन लॅब, क्लास प्रोजेक्ट, असाइनमेंट, ट्यूटोरियल, खेळ, योग, शारीरिक कौशल्य, संगीत, नृत्य, सामाजिक कार्य, एनसीसी इत्यादींच्या आधारे क्रेडिट अर्थात गुण मिळणार. परीक्षा, कक्षा परीक्षण, प्रश्नोत्तरी, कौशल्य शिक्षणात क्षेत्रीय दौरा, इंटर्नशिप, मुल्यांकन प्रशिक्षणार्थी, नोकरीवरचे प्रशिक्षण आणि अनुभवात्मक शिक्षणावर आधारित असेल.
हे ही वाचा :