बीजिंग; वृत्तसंस्था : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आता चीनने उडी घेतली असून त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मध्य पूर्व आशियात आपल्या सहा शस्त्रसज्ज युद्धनौका तैनात केल्या आहेत. याद्वारे अमेरिकेला शह देण्याचे डॅ्रगनचे मनसुबे समोर आले असल्याचे संरक्षणतज्ज्ञांना वाटू लागले आहे. (Israel–Hamas war)
संबंधित बातम्या :
अमेरिकेने या युद्धात आपली सगळी ताकद इस्रायलच्या बाजूने उभी केली आहे. त्यानंतर चीन एवढे दिवस शांत होता. मात्र, आता त्या देशानेही मध्य पूर्वेत लुडबूड सुरू केली आहे. चीनच्या नौदलाची खास तुकडी या क्षेत्रात नियमित युद्ध अभ्यास करत आहे. गेल्या आठवड्यात ती ओमानमध्ये तळ ठोकून होती. आता ही तुकडी एका गुप्त ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
चीनच्या सहा युद्धनौका शस्त्रसज्ज असून प्रत्येक नौकेवर टाईप 052 डी गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर, फ्रिगेट जिंगझोऊ आणि अन्य शस्त्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. जोडीला नौदलाच्या जहाजांचाही ताफाही या भागात कार्यरत आहे.
अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका इस्रायलच्या दिमतीसाठी पाठवल्यानंतर चीनचा संताप अनावर झाला आहे. इराणची दहशतवादी संघटना हिजबुला या युद्धात इस्रायलच्या विरोधात उतरण्याची शक्यता लक्षात घेत अमेरिका या भागात सक्रिय झाली आहे. अमेरिकेचा हा वाढता हस्तक्षेप पाहून चीननेही बाह्या सरसावल्या आहेत.
हेही वाचा :