India Sends Aid to Palestine: भारत पॅलेस्टाईनच्या मदतीला धावला; IAF C-17 विमान साहित्य घेऊन इजिप्तकडे रवाना | पुढारी

India Sends Aid to Palestine: भारत पॅलेस्टाईनच्या मदतीला धावला; IAF C-17 विमान साहित्य घेऊन इजिप्तकडे रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल-हमासच्या युद्धादरम्यान भारत पॅलेस्टिनी नागरिकांच्या मदतीला धावून गेला आहे. भारतीय हवाई दलाचे IAF C-17 हे विमान आज (दि.२२) सकाळी  वैद्यकीय आणि आपत्ती निवारण साहित्य (India Sends Aid to Palestine) घेऊन इजिप्तकडे रवाना झाले. ते इजिप्तच्या अल-अरिश विमानतळावर उतरणार आहे,  वृत्त एएनआयने दिले आहे. (Israel-Hamas war)

भारताने पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्याची मदत पाठवली आहे. हे सर्व साहित्य घेऊन IAF C-17 विमान आज गाझियाबादमधील (उत्तर प्रदेश) हिंडन एअर बेस विमानतळावरून इजिप्तकडे रवाना झाले आहे. यात जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणा-या वैद्यकीय वस्तू, तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्त साहित्य, पाणी शुद्धीकरण गोळ्या यासह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. (India Sends Aid to Palestine)

 

India Sends Aid to Palestine: पॅलेस्टिनी शहर गाझाला भारताकडून मदत

गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल आणि दहशतवादी गट हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान हमासच्या हल्ल्याला इस्रायल लष्कराने जोरदार प्रतिहल्ला चढवला. इस्रायल लष्कर पॅलेस्टिनी शहर गाझावर सातत्याने हल्ला करत आहे. यामध्ये अनेक निष्पाप पॅलेस्टिनींना आपले कुटूंब आणि जीव गमवाला लागला आहे. दरम्यान भारताने पॅलेस्टिनी शहर गाझाला रविवारी मानवतावादी मदत पाठवली. या मध्ये वैद्यकीय साहित्यासह अनेक महत्त्वाच्या जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे. (Israel-Hamas war)

हेही वाचा:

Back to top button