Israel hamas war news latest: आता जमिनीवरील आरपारच्‍या लढाईसाठी इस्‍त्रायल सज्‍ज, गाझा ताब्‍यात घेण्‍याचे उद्दिष्ट | पुढारी

Israel hamas war news latest: आता जमिनीवरील आरपारच्‍या लढाईसाठी इस्‍त्रायल सज्‍ज, गाझा ताब्‍यात घेण्‍याचे उद्दिष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने ७ ऑक्टोबरला शक्तीशाली रॉकेट हल्ला केला. यानंतर इस्रायलने देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले. हमास आणि इस्रायल यांच्यात हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवर युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान हमासविरोधी हल्ल्यानंतर जमिनीवरील आरपारच्‍या लढाईसाठी आता इस्रायल सज्‍ज झाल्याचे, इस्रायल डिफेन्स फोर्सने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Israel hamas war news latest)

संबंधित बातम्या:

इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) घोषणा केली आहे की, ते गाझावर जमीन, हवाई आणि समुद्राद्वारे हल्ल्यासाठी सज्ज आहेत. गाझा सीमेवर इस्रायल सैन्याने मोठ्या संख्येने आपले जवान तैनात केले आहेत आणि अंतिम आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत, असे देखील डिफेन्स फोर्सने म्हटले आहे.  (Israel hamas war news latest)

इस्रायलने पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीत जमिनीवर हल्ला करून गाझा शहर घेण्याचे तसेच हमास दहशतवादी नेत्यांचा नाश करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवले आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. इस्रायल गाझातील जमिन, हवाई आणि सागरी हल्ल्यासाठी तयार आहे. इस्रायलच्या या हल्ल्याचा उद्देश हमासच्या नेतृत्वाचा नायनाट करणे, ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना सोडणे आणि गाझा ताब्यात घेणे हे देखील महत्त्वाचे उद्देश आहेत. तसेच २००६ नंतर इस्रायलचे हे सर्वात मोठे ग्राउंड ऑपरेशन असेल, असेही इस्रायल डिफेन्स फोर्सने स्पष्ट केले आहे. (Israel hamas war news latest)

Israel hamas war news latest: संपूर्ण देशात इस्रायली सैन्य तैनात

इस्रायल डिफेन्स फोर्सच्या एका वरिष्ठ अधिकारी जोनाथन कॉनरिकस यांनी म्हटले आहे की, आमचे सैन्य गाझा पट्टीत लढाऊ कारवाया तीव्र करण्यास सज्ज आहेत. संपूर्ण देशात इस्रायली सैन्य तैनात करण्यात आले आहे. गाझा पट्टीत युद्धाच्या पुढील टप्प्यांसाठी कारवाईची तयारी वाढवली जात आहे. यामध्ये जमिनीवरील युद्ध कारवाईवर अधिक भर दिला जाणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांने सांगितले आहे. (Israel hamas war news latest)

गाझामध्ये १० हजार सैनिक दाखल

इस्रायलच्या सैन्याने दक्षिण इस्रायलमधील गाझा सीमेवर ३० हजारांहून अधिक सैन्य तैनात केले आहे. IDF च्या म्हणण्यानुसार, आम्ही महत्त्वपूर्ण जमिनीवरील युद्धाची योजना आखत आहे. कमीतकमी १० हजार सैनिक गाझामध्ये पुढे जात आहेत. पायदळ व्यतिरिक्त, इस्रायली संरक्षण दलात रणगाडे, सॅपर आणि कमांडो देखील असतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी आधीच गाझाजवळ मोठ्या प्रमाणात लष्करी उपकरणे हलवली आहेत.

हेही वाचा:

Back to top button