Israel hamas war : इस्रायलचा गाझातील चर्चवर हवाई हल्ला; 200 लोक ठार | Gaza Church Attack | पुढारी

Israel hamas war : इस्रायलचा गाझातील चर्चवर हवाई हल्ला; 200 लोक ठार | Gaza Church Attack

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात धार्मिक स्थळे, दवाखाने ही लक्ष होऊ लागली आहेत. गाझातील एका हॉस्पिटलवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर गाझातील एका ग्रीक चर्चवर हवाई हल्ला झाला आहे. या चर्चमध्ये पॅलेस्टाईन तसेच ख्रिस्ती नागरिकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात २००च्या आसपास नागरिक ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हल्ल्याची बातमी अल जझिरा या वृत्तवाहिनी दिली आहे. तर द वायर या वेबसाईटच्या बातमीत मृतांची संख्या १५० ते २०० असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हमासचे प्रतिनिधी आणि चर्चच्या प्रशासकांनी या हल्ल्याला इस्रायल जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
या चर्चचे नाव सेंट पोरफायरिअस असे आहे. हे गाझातील सर्वांत जुने चर्च आहे. चर्चचे फादर एलियास यांनी यापूर्वीच चर्चवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती. जर असा कोणताही हल्ला चर्चवर झाला तर, तो मानवतेवरील हल्ला ठरेल, असे एलियास यांनी यापूर्वीच म्हटले होते. वॉशिंग्टन पोस्टनेही या हल्ल्याची खातरजमा केली आहे.

चर्चने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आर्चबिशप अलेक्सिओस सुरक्षित आहेत, पण ते जखमी आहेत, का यबद्दल माहिती नाही. या चर्चमध्ये ५०० लोकांनी आश्रय घेतला होता. चर्चमध्ये दोन हॉल आहेत, तेथे हे लोक राहात होते, यात काही लहान मुले ही होती. जागेवरील स्थिती पाहाता १५० ते २०० लोक मारले गेले असावेत असे दिसते. बॉम्ब या दोन्ही हॉलवर पडले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.” Gaza Church Attack

गाझात आतापर्यंत तीन हजार लोक मारले गेले आहेत, तर १२५०० लोक जखमी आहे. तर इस्रायलमधील १४०० लोक मारले गेले आहेत.

हेही वाचा

Back to top button