Giorgia Meloni | इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा घटस्फोट; महिलाविरोधी टिप्पणी केल्याने नवऱ्याला शिकवला धडा | पुढारी

Giorgia Meloni | इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा घटस्फोट; महिलाविरोधी टिप्पणी केल्याने नवऱ्याला शिकवला धडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचा पती अँड्रिया जियाम्ब्रुनो यांच्यापासून घटस्फोट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः पोस्ट करत दिली आहे. या दोघांचे नाते जवळपास १० वर्षानंतर संपुष्टात आले आहे. एका टीव्ही शोवरी कार्यक्रमात महिलाविरोधी टिप्पणी करण्यावरून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी हे पाऊल उचलले आहे.  इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि जर्नालिस्ट अँड्रिया जियाम्ब्रुनो यांना एक मुलगी देखील आहे. (Italian Prime Minister Meloni)

Italian Prime Minister Meloni : अँड्रिया जियाम्ब्रुनोशी माझे नाते संपले

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये इटलीच्या पीएम मेलोनी यांनी म्हटले आहे की, अँड्रिया जियाम्ब्रुनो सोबतचे त्यांचे नाते संपले आहे. काही काळापूर्वी त्यांचे मार्ग वेगळे झाल्याचे त्यांनी सांगितले. ऑन-एअर टेलिव्हिजन व्यक्तिमत्व जिआमब्रुनो सहकाऱ्यांना अश्लील टिप्पण्या करताना ऑडिओवर पकडले गेल्या नंतरच्या वादानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

अँड्रिया जियाम्ब्रुनो कोण आहेत? महिलाविरोधी टिप्पणी काय केली होती?

इटलीच्या पीएम मेलोनी यांचे जोडीदार अँड्रिया जियाम्ब्रुनो हे व्यवसायाने पत्रकार आहेत. ते एका टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखले जातात. अँड्रिया यांनी एका कार्यक्रमादरम्यान अत्याचार पीडितेवर चुकीची टिप्पणी केली होती. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. एका टीव्ही शो दरम्यान पत्रकार अँड्रिया यांनी अत्याचार पीडितेवरच अनेक प्रश्न उपस्थित केले होते. जर तुम्ही नाचत असाल तर तुम्हाला दारू पिण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण तुम्ही हे टाळले तर तुम्ही इतर अनेक गोष्टी टाळू शकता.

मेलोनी म्हणाल्या…. ‘अँड्रिया’ला धन्यवाद!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीने त्यांच्या नातेसंबंधासाठी आणि त्यांच्या मुलीबद्दल विभक्त पती जिआम्ब्रुनोचे आभार मानले आहेत. दरम्यान, त्यांनी सांगितले की, पती- पत्नी हे नाते संपले असले तरी, त्या त्यांच्या मैत्रीचे रक्षण करतील. तसेच जी तिची आई आणि वडिलांवर खूप प्रेम करते त्या माझ्या ७ वर्षाच्या मुलीचे मी रक्षण करीन असेदेखील जॉर्जिया मेलोनी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button