Giorgia Meloni | इटलीत मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार पहिल्या महिला पंतप्रधान, पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा | पुढारी

Giorgia Meloni | इटलीत मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार पहिल्या महिला पंतप्रधान, पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा

रोम : इटलीमधील सार्वत्रिक निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या फ्रॅटेली डी’इटालिया (Brothers of Italy) पक्षाच्या अध्यक्ष जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत. जॉर्जिया मेलोनी या इटलीचा तानाशाह मुसोलिनीच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील इटलीत उजव्या विचारसरणीचे सरकार स्थापन होत आहे. इटली ही युरोपियन युनियनमधील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.

ज्योर्जिया मेलोनी यांनी छोट्या पक्षांना सोबत घेऊन युती केली होती. या युतीने ४३.८ टक्के मते मिळवून संसदेत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. Chamber of Deputies या संसदेच्या ४०० जागा असलेल्या कनिष्ठ सभागृहात ‘ब्रदर्स ऑफ इटली’च्या नेतृत्वातील युतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. तर २०० जागा असलेल्या वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये ११५ जागा मिळवल्या आहेत.

मेलोनी (Giorgia Meloni) यांनी म्हटले आहे की त्यांचा ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्ष सरकार स्थापन करणार असून आम्ही लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ‘ब्रदर्स ऑफ इटली’च्या नेतृत्वातील उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या बाजूने इटालियन लोकांनी कौल दिला आहे. असे त्यांनी रोममध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले. “धन्यवाद इटली” असे म्हणत त्यांनी इटलीतील जनतेचे आभार मानले आहेत.

एनरिको लेटा हे जॉर्जिया मेलोनी यांचे प्रतिस्पर्धी होते. मेलोनी यांचा विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर एनरिको लेटा यांनी, उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा विजय हा इटली आणि युरोपसाठी दुःखाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

जॉर्जिया मेलोनी कोण आहेत?

२०१२ मध्ये जॉर्जिया मेलोनी यांनी ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्ष स्थापना केला होता. हा उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. जॉर्जिया मेलोनी ह्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन…

दरम्यान, इटलीतील सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रॅटेली डी’इटालिया पक्षाच्या अध्यक्ष जॉर्जिया मेलोनी यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे ट्विट करत म्हटले आहे.


हे ही वाचा :

Back to top button