इटलीत ‘मुसोलिनी’ परतला – महिलेच्या नेतृत्वात प्रथमच उजव्या विचारांचा पक्ष येणार सत्तेवर

ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या प्रमुख जॉर्जिया मेलोनी
ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या प्रमुख जॉर्जिया मेलोनी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – इटलतील उजव्या विचाराचा पक्ष असलेल्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षामो नेत्या जिऑर्जिआ मेलोनी यांच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक निवडणुकात विजय मिळवला आहे. त्या आता देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील. बेनिटो मुसोलिनीच्या फॅसिस्ट सरकारनंतर इटलीत पहिल्यांदाच उजव्या विचाराचा पक्ष सत्तेत येत आहे, असे CNNने म्हटलं आहे. (Far right Giorgia Meloni to become Italy's prime minister)

मेलोनी म्हणाल्या, "ही अभिमानाची रात्र आहे. उद्यापासून आपल्याला आपले मूल्य दाखवून द्यायचे आहे. इटलीत नागरिकांनी आपल्याला संधी दिली आहे, आम्ही त्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही." ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाच्या आघाडीने एकूण ४४ टक्के मते मिळवली आहेत. पूर्ण निकाल सोमवारी उशिरापर्यंत अपेक्षित आहे, तर सरकार स्थापनेसाठी अजून काही आठवडे जातील.

जॉर्जिया मेलोनी या २००६ला राजकारणात आल्या. त्यानंतर २०१२ला त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. युरोपियन युनियन आणि स्थालंतरितांना विरोध ही त्यांची राजकीय विचारधारा आहे. मेलोनी या प्रतिगामी विचारांच्या आहेत समलिंगी विवाह, गर्भपाताचा अधिकार यांनाही त्यांनी विरोध केलेला आहे. २०१८ला त्यांच्या पक्षाला फक्त ४.५टक्के इतकी मते मिळाली होती. पण त्यानंतर सत्ताधारी विचारांच्या विरोधात इटलीचे जनमत झुकू लागले. इटलीती प्रागतिक विचारांचा पक्ष डेमोक्रॅटिक पार्टीने पराभव मान्य केला आहे. ही घटना एक दुःखद संध्याकाळ आहे, असे पक्षाचे अध्यक्ष देबोरा सेराचैनी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news