पुढारी ऑनलाईन डेस्क : G-20 परिषदेत आज (दि.९ ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उपस्थितीत 'ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्स'चे (जैव इंधन संघटन) अनावरण केले.
जैव इंधन संघटनची स्थापना केली जाईल. भारत, अमेरिका आणि ब्राझील हे त्याचे संस्थापक सदस्य असतील, असे जी20 जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले होते.
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जैवइंधन संघटनची घोषणा केली आहे. भारतासह अमेरिका आणि ब्राझील या एकूण १९ देशांमधील आणि १२ आंतरराष्ट्रीय संस्थांनी एकत्र येऊन जागतिक जैवइंधन अलायन्स स्थापन केली आहे, असे केंद्रीय मंत्री हरदीपपुरी यांनी म्हटले आहे.