Afghanistan earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपातील मृतांची संख्या ४ हजारांवर, २ हजार घरे उद्ध्वस्त | पुढारी

Afghanistan earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपातील मृतांची संख्या ४ हजारांवर, २ हजार घरे उद्ध्वस्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम अफगाणिस्तानला शनिवारी (दि.७) ६.३ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले. या जोरदार भूकंपातील मृतांचा आकडा आता ४ हजारांवर पोहोचला आहे. तीव्र भूकंपाने येथील इमारती पडल्याने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यामध्ये मोठी जीवितहानी झाली असून सुमारे २ हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असे अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ANDMA) सांगितले. (Afghanistan earthquake)

संबंधित बातम्या : 

ANDMA चे प्रवक्ते मुल्ला सैक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हेरात प्रांत आणि शेजारच्या भागात शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के बसले. आतापर्यंत, आम्हाला अपघातातील बळींची मिळालेली आकडेवारी ४ हजार पेक्षा जास्त आहे. सुमारे २० गावांमध्ये, अंदाजे २ हजार घरे पूर्णपणे कोसळली आहेत. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, विविध संस्थांमधील ३५ बचाव पथकातील एकूण १ हजारहून अधिक बचावकर्ते प्रभावित भागात मदत कार्य करत आहेत. (Afghanistan earthquake)

दरम्यान, अफगाणिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद यांनी सोमवारी हेरात प्रांतातील भूकंपग्रस्त भागांना भेट दिली. चीनने रविवारी अफगाण रेड क्रेसेंटला २ लाख यूएस डॉलर मदत म्हणून घोषीत केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button