

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर जपानी हवामान संस्थेनेही सुनामीचा इशारा दिला आहे. इझू बेटावर समुद्राच्या लाटा १ मीटर उंचीपर्यंत येण्याची शक्यता हवामान संस्थेने वर्तवली आहे. जपानी वेळेनुसार आज (दि. ५) रोजी सकाळी ११ वाजता भूकंप झाला. (Japan EarthQuake)
माहितीनुसार, जपानमध्ये आज (दि. ५) रोजी सकाळी ११ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी सांगण्यात आले आहे. हवामान संस्थेने जपानच्या इझू बेटावर १ मीटर उंचीपर्यंत लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे, तर पूर्वेकडील चिबा प्रांतापासून पश्चिमेकडील कागोशिमा प्रीफेक्चरपर्यंत पसरलेल्या भागात ०.२ मीटरपर्यंत लाटा येण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून किनारपट्टी भागातील लोकांना उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा