पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तुफान धुमश्चक्री! गोळीबारानंतर तोरखाम सीमा सील

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तान आणि अफगाणिस्‍तानमधील संघर्षाचा भडका उडला आहे. सीमेवर दोन्‍ही देशांकडून जोरदार गोळीबार करण्‍यात आल्‍यानंतर तोरखाम सीमा सील करण्‍याचा आली आहे. येथील सर्व वाहतूक बंद करण्‍यात आल्‍याचे वृत्त 'द खोरासान डायरी'ने दिले आहे. (Pakistan vs Afghanistan)

'द खोरासान डायरी'ने दिलेल्‍या माहितीनुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कराचे अधिकारी अफगाणिस्‍तान सीमेवर पोहोचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी पावले उचलली जात आहेत. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्येही दोघांमधील तोरखाम सीमा सील करण्यात आली होती. यानंतर पाकिस्‍तान-अफगाणिस्‍ताना संबंधात सुधारल्‍यानंतर पुन्‍हा सीमा सुरु करण्‍यात आली हाेती. दरम्‍यान, पूर्व अफगाण प्रांत नांगहारमधील तालिबान प्रशासनाच्या पोलिस दलाच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितले की, तोरखाम सीमा सील केली आहे आणि आम्ही नंतर चर्चा करु.

तालिबानने सत्ता काबीज केल्‍यापासून संघर्षात वाढ

अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. मागील वर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनारमध्ये हवाई हल्ल्‍यात ३६ तालिबानी ठार झाले होते. मात्र या हल्‍ल्‍याची जबाबदारी पाकिस्‍तानने घेतली नव्‍हती. अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यानंतर तालिबानने काबूलस्थित पाकिस्तानी राजदूताला बोलावून असे हल्ले त्वरित थांबवण्यास सांगितले होते. अफगाणिस्तानातील दहशतवादी सीमा ओलांडून हल्ले करतात, असा दावा पाकिस्‍तान लष्‍कराकडून केला जात आहे. तर तालिबानने स्‍पष्‍ट केले आहे की, ऑगस्‍ट २०२२ पासून परिस्‍थिती नियंत्रणात आहे. (Pakistan vs Afghanistan)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news