पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने आज रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा केली. अमेरिकन रसायन शास्त्रज्ञ मौंगी जी. बावेंडी, लुईस ई. ब्रुस आणि अलेक्सी. आय. एकिमोव्ह यांना रसायनशास्त्रातील २०२३ चे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. 'क्वांटम डॉट्सचा शोध आणि विकासासाठी' यंदाचे 'रसायनशास्त्रातील नोबेल' देण्यात येत असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे. (Nobel Prize in Chemistry 2023)
२०२३ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे क्वांटम डॉट्स या नॅनोकणांचा शोध आणि विकासाला पुरस्कृत करते. तसेच त्यांचा आकार आणि गुणधर्म निर्धारित करते. आज क्वांटम डॉट्स नॅनोटेक्नॉलॉजीच्या टूलबॉक्सचा एक महत्त्वाचा भाग आहेत. रसायनशास्त्रातील २०२३ चे नोबेल परितोषिक विजेते सर्व नॅनोवर्ल्डच्या शोधात अग्रणी असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने नमूद केले आहे. (Nobel Prize in Chemistry 2023)
नोबेल पारितोषिक वितरणाच्या तिसऱ्या दिवशी आज (दि.४) रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने (The Royal Swedish Academy of Sciences) रसायनशास्त्रातील नोबेलची घोषणा केली. काल मंगळवारी(दि.३) भौतिकशास्त्रातील नोबेल तर सोमवारी (दि.२) वैद्यकीयशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली होती. (Nobel Prize in Chemistry 2023)
संशोधन करण्यात आलेले 'क्वांटम डॉट्स' या नॅनोकणांचा शोध आणि विकासासाठी नोबेल जाहीर झाले आहे. हे नॅनोकण इतके लहान आहेत की, त्यांचा आकार त्यांचे गुणधर्म ठरवतो. नॅनोटेक्नॉलॉजीचे हे सर्वात लहान घटक आहेत, जे आता टेलिव्हिजन आणि LED दिव्यांनी त्यांचा प्रकाश पसरवतात. ते रासायनिक अभिक्रिया उत्प्रेरित करतात. तसेच इतर अनेक गोष्टींबरोबरच सर्जन ट्यूमर टिश्यू काढण्यास मदत करू शकतात, असेही रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्से स्पष्ट केले आहे. (Nobel prize in chemistry 2023 )
संशोधकांनी प्रामुख्याने रंगीत प्रकाश तयार करण्यासाठी क्वांटम डॉट्सचा वापर केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे, की भविष्यात क्वांटम डॉट्स लवचिक इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म सेन्सर्स, स्लिमर सोलर सेल आणि एन्क्रिप्टेड क्वांटम कम्युनिकेशनमध्ये योगदान देऊ शकतात, असेही रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
1993 मध्ये रसायनशास्त्र विजेते मौंगी बावेंडी यांनी क्वांटम डॉट्सच्या निर्मितीच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणली. ज्यामुळे त्यांची गुणवत्ता वाढली. आजच्या नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये क्वांटम डॉट्सचा वापर महत्त्वपूर्ण मानला जातो. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस रसायनशास्त्र विजेते लुईस ब्रुस आणि अलेक्सी एकिमोव्ह क्वांटम डॉट्स एकमेकांपासून स्वतंत्र करण्यात यशस्वी झाले.
हे अतिशय लहान नॅनोकण इतके प्रभावित असतात की, ते त्यांचा क्वांटम प्रभाव आणि त्यांची वैशिष्ट्ये कायम ठेवतात, असेही संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.