AAP On Sanjay Singh Arrest | आप खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरून आपचे भाजपला चॅलेंज | पुढारी

AAP On Sanjay Singh Arrest | आप खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरून आपचे भाजपला चॅलेंज

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना काल ईडीने ताब्यात घेतले. यावर आपच्या आतिशी मारलेना यांनी ‘सिंह यांच्या निवास्थानातून एक रूपयाचाही भ्रष्टाचार सापडला, तर पुरावे देशासमोर सादर करावेत’ असे सत्ताधारी भाजप सरकारला चॅलेंज दिले आहे. खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर आज माध्यमांशी बोलताना आतिशी यांनी आपची भूमिका स्पष्ट केली. (AAP On Sanjay Singh Arrest)

माध्यमांशी बोलताना आतिशी म्हणाल्या, मला भाजपला सांगायचे आहे की, त्यांनी खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानावर छापे टाकलेच आहेत. तर ईडी आणि सीबीआयने त्यांच्या वडीलोपार्जित घर आणि बँक लॉकरवरदेखील छापा टाकण्याचे मी आमंत्रण देते. मी चॅलेंज देते की, भष्टाचाराचा एक पैसा देखील सापडणार नाही, असेही आतिशी यांनी स्पष्ट केले आहे. (AAP On Sanjay Singh Arrest)

संजय सिंह यांच्या अटकेवर बोलताना आप नेते आतिशी म्हणाल्या, दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी तपासात ईडी आणि सीबीआयने १५ महिन्यांपासून ५०० हून अधिक अधिकारी तैनात केले आहेत. या अधिकाऱ्यांनी हजारो ठिकाणी छापे टाकले, पण त्यांना कोणताही भ्रष्टाचाराचा पुरावा सापडला नाही. ते न्यायालयात कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर छापे टाकले आणि काहीही सापडले नाही. पण भाजपला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नसताना मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. आणि आता संजय सिंह यांच्याबाबत पुन्हा अशीच घटना घडत आहे, ही बाब चिंताजनक आहे. (AAP On Sanjay Singh Arrest)

हेही वाचा:

Back to top button