जो बायडेन यांच्या जर्मन शेफर्डने घेतला ‘सिक्रेट एजंट’चा चावा | पुढारी

जो बायडेन यांच्या जर्मन शेफर्डने घेतला 'सिक्रेट एजंट'चा चावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन  यांच्या जर्मन शेफर्डने  व्हाईट हाऊसमध्ये आणखी  एका सिक्रेट एजंटचा
(गु्‍प्‍तचर विभागातील कर्मचारी) चावा घेतला. ‘सीएनएन’च्या वृतानुसार ही घटना  सोमवारी (दि.२५) सायंकाळी घडली आहे. विशेष म्‍हणजे, बायडेन यांच्‍या जर्मन शेफर्डने आतापर्यंत ११ जणांचा चावा घेतला आहे.

‘यूएसएसएस’ कम्युनिकेशनचे प्रमुख अँथनी गुग्लिएल्मी यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या माहितीनुसार, गुप्त सेवा युनिफॉर्म्ड डिव्हिजनचा कर्मचारी श्वानाच्या संपर्कात आला. यावेळी श्वानाने त्याचा चावा घेतला. संकुलातील वैद्यकीय त्‍याच्‍यावर उपचार केले आहेत. या श्वानाने आतापर्यंत ११ वेळा चावा घेतला आहे. सीक्रेट सर्व्हिस युनिफॉर्म्ड डिव्हिजनचे प्रमुख अल्फोन्सो एम. डायसन सीनियर हे जखमी अधिकाऱ्याशी बोलले आहेत.

नोव्हेंबर २०२२ मध्ये बायडेन यांच्‍या जर्मन शेफर्डने एका अधिकाऱ्याच्या  हात आणि मांडीवर चावा घेतला होता. या घटनेच्या एका आठवड्यानंतर आणखी एका एजंटला चावा घेतला जेव्हा तो जिल बायडेनसोबत फिरायला गेला होता. ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत चावण्याच्या इतर सहा घटना घडल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button