Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू?; मुलाच्या ‘X’ वरील पोस्टमुळे खळबळ

Donald Trump
Donald Trump
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झाला आहे. या त्यांच्या मुलाच्या X (ट्विटर) वरील पोस्टमुळे एकच खळबळ निर्माण झाली. मात्र, त्यांच्या मुलाचे X खाते हॅक झाले असल्याची माहिती समोर आले आहे. त्यानंतर ही पोस्ट हटवण्यात आली. मात्र, तत्पूर्वी ही पोस्ट अनेकांनी रिपोस्ट केली. X वर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यापैकी एकाला 140K इतके व्ह्यूव्ज मिळाले, असे इंडिया टुडेच्या बातमीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

'माझे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाले आहे,' हे बुधवारी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरच्या सत्यापित हँडलवरील पोस्टपैकी एक होते. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मात्र नंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे X (ट्विटर) खाते बुधवारी हॅक झाले आणि त्यावरून अनेक ट्विट पोस्ट करण्यात आले. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना लक्ष्य करणारी पोस्ट देखील करण्यात आली होती.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरच्या पोस्टला 140K व्ह्यूव्ज

20 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरच्या सत्यापित X प्रोफाइलवर पोस्टची मालिका शेअर करण्यात आली होती. मला जाहीर करताना दुःख होत आहे, माझे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाले आहे. मी 2024 मध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहे. अशी ही पोस्ट होती. या पोस्टला 140K इतके व्ह्यूव्ज मिळाले.

खाते हॅक झाल्याची अनेकांना खात्री असली तरी, अनेक X वापरकर्त्यांना यासंबंधीची बातमी आढळली. दरम्यान हॅकिंगच्या या घटनेने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या ऑनलाइन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. तसेच चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि नकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Donald Trump : पोस्टमुळे डिजिटल माहितीच्या रक्षणाची आव्हाने

दरम्यान नंतर ही पोस्ट त्वरीत काढून टाकण्यात आली. मात्र, या घटनेने आधुनिक युगातील डिजिटल ओळख आणि माहितीचे रक्षण करण्याशी संबंधित आव्हानांची स्पष्ट आठवण करून दिली. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा आणि त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प, राजकीय आणि सोशल मीडिया क्षेत्रात सक्रिय व्यक्ती आहेत. त्यांची मते आणि व्यक्त करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news