हुकूमशहा किम यांना शुभेच्छा दिल्याने डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! | पुढारी

हुकूमशहा किम यांना शुभेच्छा दिल्याने डोनाल्ड ट्रम्प अडचणीत!

वॉशिंग्टन ः वृत्तसंस्था उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांना शुभेच्छा दिल्याने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत आले आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. नुकतेच उत्तर कोरियाचा जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) कार्यकारी बोर्डात समावेश करण्यात आला आहे. या बोर्डात उत्तर कोरियाशिवाय अन्य 9 देशांचा समावेश आहे.

हे सर्व देश एकत्रित काम करून जगभरातील आरोग्य काळजीचे मापदंड निश्चित करणार आहेत. यानंतर ट्रम्प यांनी किम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. डब्लूएचओमध्ये उत्तर कोरियाला महत्त्वाचे स्थान मिळाल्याबद्दल किम यांचे अभिनंदन! असा संदेश ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या संदेशातच किम जोंग यांचे नाव किम जंग असे लिहिले आहे, हे विशेष!

ट्रम्प यांच्या संदेशावर रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतील उमेदवार निक्की हेली म्हणाल्या की, किम जोंग देशवासीयांना उपासमारीने मारत आहेत. अशातच उत्तर कोरियाला डब्लूएचओमध्ये स्थान मिळणे फारच दुर्दैवी आहे. हुकूमशहा किमसारख्या ठग्याला शुभेच्छा देणे गंमतीची गोष्ट नाही. किमने अनेकवेळा अमेरिकेला धमकी तर दिली आहे तसेच आमच्या मित्र देशांनाही घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे.

आश्चर्याचा धक्का

जॉर्जियाचे गव्हर्नर ब—ायन कॅम्प यांनी ट्रम्म यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, किम यांना शुभेच्छा देणे अत्यंत चूकीचे आहे तर फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉ डी-सँडिस म्हणाले की, ट्रम्प यांच्या वक्तव्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Back to top button