पुढारी ऑनलाइन डेस्क : Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. या वर्षात त्यांना चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना अटक करण्यात आली. जॉर्जियातील फुल्टन कॉटनी तुरुंगाने त्यांचा तुरुंगातील फोटो प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही माजी राष्ट्राध्यक्षांचा अशा प्रकारचा मग शॉट घेण्यात आलेला नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासच घडवला आहे. राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतील घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. नंतर 20 मिनिटांनी त्यांना जामिनावर सुटका देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चार वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले असून वकिलांनी 45 पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे. अटकेनंतर त्यांना 20 मिनिटांमध्येच त्यांना सोडण्यात आले आहे. तर फुल्टन जेलने त्यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या अटकेच्या वृत्ताने त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर त्यांच्या नावाचे बॅनर घेऊन गर्दी केली होती. (Donald Trump)
2020 च्या यूएस निवडणुकीचे निकालात घोटाळा करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांची चौकशी करणाऱ्या विशेष वकिलाने 45 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ट्रम्प यांच्यावर 4 आरोप करण्यात आले होते. 1- युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचा कट, 2- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणण्याचे षड्यंत्र, 3- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणणे आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे. 4- हक्कांविरुद्ध कट. (Donald Trump)
तर टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, जॉर्जियाच्या दक्षिणेकडील राज्यात 13 आरोपांवर ट्रम्प यांना अधिकृत अटक झाली. हे आरोप 2020 च्या निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्याच्या त्याच्या कथित प्रयत्नांशी जोडले गेले होते.
दरम्यान, ट्रम्प यांनी आत्मसमर्पण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ट्रम्प यांना $200,000 बॉन्डवर सोडण्यात आले. काही अटींच्या आधारे त्यांना जामीन देण्यात आला आहे. यामध्ये ट्रम्प यांनी सह-प्रतिवाही, साक्षीदार किंवा त्यांच्यासह कटात सहभागी असलेल्या अन्य लोकांना कोणत्याही प्रकारची स्पष्ट अस्पष्ट धमकी देणार नाही. यामध्ये सोशल मीडिया किंवा शेअर्स इत्यादींचा देखील समावेश आहे. या व्यतिरिक्त कायदेशीर प्रतिनिधी आणि संभाव्य साक्षीदारांच्या संपर्कात राहण्याचे वचन त्यांच्याकडून घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
त्यांचा ताफा अटलांटा येथील हार्ट्सफील्ड-जॅक्सन विमानतळाकडे निघाला. जिथे ते खाजगी जेट न्यू जर्सी गोल्फ क्लबसाठी रवाना होणार आहेत.
ट्रम्प तुरुंगात पोहोचताच डझनभर समर्थक बॅनर आणि अमेरिकन झेंडे फडकावत ट्रम्प यांची झलक पाहण्यासाठी उभे राहिले. बाहेर जमलेल्या ट्रम्प समर्थकांमध्ये जॉर्जियाचे यूएस प्रतिनिधी मार्जोरी टेलर ग्रीन होते. ग्रीन माजी अध्यक्षांच्या सर्वात विश्वासू सहाय्यकांपैकी एक होते. अटलांटा परिसरात एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करणारे 49 वर्षीय लायल रावर्थ गुरुवारी सकाळपासून 10 तास तुरुंगाजवळ थांबले होते. ते म्हणाले की मला आशा आहे की त्यांनी मला झेंडे फडकवताना, समर्थन देताना पाहिले असेल.
हे ही वाचा :