Twitter सेवेसाठी आता सर्वांनाच मोजावे लागणार पैसे! : मस्क यांनी दिले संकेत | पुढारी

Twitter सेवेसाठी आता सर्वांनाच मोजावे लागणार पैसे! : मस्क यांनी दिले संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी सोशल प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्‍यानंतर X नामांतरासह अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता सर्व Twitter सेवा वापरकर्त्यांसाठी मासिक शुल्क लागू करण्याचे संकेत दिले आहेत, असे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे.

संबंधित बातम्‍या 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी साेमवारी(दि.१८) झालेल्या संभाषणादरम्यान मस्क यांनी सांगितले की, X चे (पूर्वीचे ट्विटर) महिन्‍याचे वापरकर्ते ५५०दशलक्ष आहेत. तर या सोशल प्लॅटफॉर्मवर दैनंदिन 100 ते 200 दशलक्ष पोस्‍ट केल्‍या जातात. X चे (पूर्वीचे ट्विटर) व्‍यासपीठ कोणत्याही गटावर हल्ला करण्याविरोधात आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.अलीकडच्या काळात, X वरील द्वेषपूर्ण भाषण आणि ज्यू संघटनेवर आरोपांकडे दुर्लक्ष केल्‍याने मस्क यांना नागरी हक्क गटांच्या प्रतिक्रियेचा सामना करावा लागला हाेता.

Twitter सेवेसाठी पैसे का मोजावे लागणार?

ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क यांनी कंपनीच्‍या धोरणात अनेक बदल केले आहेत. त्‍यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या पूर्वी बंदी घातलेल्या खात्यांना परत येण्याची परवानगी दिली. प्रसिद्ध लोकांची खाती ओळखणारी “ब्लू टीक” पडताळणी प्रणालीही त्यांनी काढून टाकली. ट्विटरचे नाव त्यांनी X असे केले आहे. मस्‍क यांनी नेतन्याहू यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान संकेत दिले आहेत की, लवकरच X वापरकर्त्यांना मासिक शुल्क द्यावे लागेल. बनावट खात्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्‍याने त्‍यांनी या निर्णय घेतला असल्‍याचे मानले जात आहे. वापरकर्त्यांसाठी मासिक शुल्क किती असेल. तसेच मासिक शुल्‍क दिल्‍यानंतर वापरकर्त्यांना कोणते फायदे मिळतील याबाबत मस्क यांनी स्‍पष्‍ट केलेले नाही.

हेही वाचा : 

Back to top button