Elon Musk | एका दिवसात उडाले १.९१ अब्ज डॉलर, एलन मस्क यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीतील पहिले स्थान गमावले

Block Feature
Block Feature
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) या आठवड्याच्या सुरुवातीला जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले होते. पण आज शुक्रवारी त्यांनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावले. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index) सुमारे ७.७१ अब्ज डॉलरच्या तोट्यानंतर मस्क यांची एकूण संपत्ती १७६ अब्ज डॉलर इतकी आहे.

दरम्यान, LVMH चे संस्थापक बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून यादीत पहिले स्थान मिळवले आहे. अरनॉल्ट यांच्या संपत्तीत ७१० दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर झाली आहे.

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार (Forbes Real-Time Billionaires List), मस्क यांची सध्याची एकूण संपत्ती १८६ अब्ज डॉलर आहे. तर अरनॉल्ट यांची वैयक्तिक संपत्ती २११.२ अब्ज डॉलर ए‍वढी आहे.

मस्क यांच्या संपत्तीत ५०.१ अब्ज डॉलरची वाढ झाल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिले स्थान मिळवले होते. त्यावेळी मस्क यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर होती. यामुळे त्यांनी LVMH चे संस्थापक बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकले होते.

बुधवारी टेस्लाचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांने घसरले. यामुळे मस्क यांचे एका दिवसात सुमारे १.९१ अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. तर ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार त्यांची संपत्ती १७६ अब्ज डॉलरवर आली.

अरनॉल्ट आणि मस्क (Elon Musk) यांच्यानंतर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट आणि ओरॅकलचे लॅरी एलिसन यांचा जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index), जेफ बेझोस, बिल गेट्स, वॉरेन बफेट आणि एलिसन यांची अनुक्रमे ११६ अब्ज डॉलर, ११४ अब्ज डॉलर, १०७ अब्ज डॉलर आणि १०० अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news