तालिबानी म्‍होरक्‍याला मस्‍क यांचे कौतूक; पण झुकरबर्ग यांच्‍या ‘मेटा’ला फटकारले! काय आहे कारण ?

तालिबानी म्‍होरक्‍या हक्‍कानी याने ट्विटरचे  मालक एलॉन मस्‍क यांचे कौतुक केले आहे.
तालिबानी म्‍होरक्‍या हक्‍कानी याने ट्विटरचे मालक एलॉन मस्‍क यांचे कौतुक केले आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तालिबान (Taliban) हा शब्‍द उच्‍चारला तरी अफगाणिस्‍तानमधील दहशतवाद आणि महिलांचे शोषण हे चित्र डोळ्यासमोर येते. दहशतवादाच्‍या जोरावर अफगाणिस्‍तानची सत्ता काबीज केलेल्‍या तालिबानी हे तसे सोशल मीडियावर ॲपवर भाष्‍य करतील, अशी कल्‍पना करता येणार नाही. मात्र तालिबानी म्‍होरक्‍या अनस हक्‍कानी याने चक्‍क ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्‍क ( Elon Musk ) यांचे कौतुक केले आहे. मात्र त्‍याचवेळी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्‍या मेटा ( Meta) कंपनीला फटकारले आहे. ( Taliban praises Elon Musk ) जाणून घेवूया यामागील कारण…

म्‍हणे, ट्विटरची जागा इतर प्लॅटफॉर्म घेऊ शकत नाहीत

ट्विटरचे कौतुक करताना हक्कानी यांनी ट्विट केले आहे की, "ट्विटरचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा दोन महत्त्वाचे फायदे आहेत. पहिला विशेषाधिकार म्हणजे भाषण स्वातंत्र्य. तर दुसरा विशेषाधिकार म्हणजे Twitter चे सार्वजनिक स्वरूप आणि विश्वासार्हता. ट्विटरचे मेटासारखे असहिष्णु धोरण नाही. इतर प्लॅटफॉर्म त्याची जागा घेऊ शकत नाहीत, असाही दावा हक्‍कानी याने केला आहे. ( Taliban praises Musk )

Taliban praises Musk : तालिबानी 'मेटा'चा द्वेष का करतात?

तालिबानचा म्‍होरक्‍याने मेटा कंपनी (पूर्वीचे फेसबुक) पेक्षा ट्विटरला प्राधान्य का दिले, या प्रश्‍नाचे उत्तर फेसबुकनेच दिले आहे. फेसबुकने त्यांच्या धोरणांनुसार तालिबानला 'दहशतवादी संघटना' म्हणून लेबल केले आहे. यामुळे तालिबान्‍यांना या
व्‍यासपीठावर त्यांचे विचार मुक्तपणे सामायिक करण्यापासून प्रतिबंधित केले जाते. याउलट, Twitter वरवर त्यांना आपले विचार मांडण्‍यासाठी अधिक स्वातंत्र्य प्रदान करते.

तालिबान्‍यांना ट्विटरवर 'माेकळीक'

विशेष म्हणजे तालिबानचे 'इस्लामिक अमिरात अफगाणिस्तान' नावाचे सक्रिय ट्विटर अकाउंट आहे. त्‍याचे सुमारे ३५ हजार फॉलोअर्स आहेत. ते उर्दू भाषेतील पोस्टसह खाते वारंवार अपडेट करतात. ट्विटरमुळे तालिबान्‍यांना आपले संदेश अधिक लोकांपर्यंत मोकळेपणाने पोचवता येतात. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि त्यांच्या सरकारची कोणतीही धोरणे ट्विटरवर स्वतःला व्यक्त करण्यात बऱ्यापैकी मुक्तता आहे.

Taliban praises Musk : मेटावर 'तालिबान' हा वाईट शब्‍दांच्‍या यादीत

मेटा वर 'तालिबान' हा वाईट शब्‍दाच्‍या यादीत आहे. जेव्हा तुम्‍ही फेसबुकवर 'तालिबान' हा शब्द शोधता तेव्हा चिंता वाढवणाऱ्या संदेशाने स्वागत होते. हा शब्द बहुतांशवेळा धोकादायक व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित असतो, या शब्‍दाला Facebook वर परवानगी नाही, असे स्‍पष्‍ट करण्‍यात येते. तसेच आम्हाला शोध सुरू ठेवायचा आहे का, याची पुष्टी करण्यासही सांगितले जाते. तुम्‍ही हा शोध सुरु ठेवला तर तुम्ही शोधलेला शब्द कधीकधी धोकादायक व्यक्ती आणि संस्थांच्या क्रियाकलापांशी संबंधित असतो. ज्यांना Facebook वर प्रतिबंध आहे. त्‍यामुळे तालिबान्‍यांकडून मेटा कंपनीचा व्‍देष केला जात असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

हक्कानी याने ट्विटरला प्राधान्य दिले जात असले तरी, एलॉन मस्क यांनी पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरमध्‍ये केलेले बदल सर्वच ट्विटर वापरकर्‍त्यांना रुचलेले नाहीत. मस्‍क यांनी ट्विटर ताब्‍यात घेतल्‍यापासून कंपनीची कर्मचारी संख्या जवळजवळ ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी सुमारे ८ हजार जणांना आपल्‍या नोकर्‍या गमवाव्‍या लागल्‍या आहेत. मस्क यांनी महत्त्वपूर्ण बदल करत सशुल्क सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राधान्य देण्‍याचे धोरण राबवले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news