Rain update : बाप्पाच्या आगमनाला पाऊस लावणार का हजेरी ? जाणून घ्या | पुढारी

Rain update : बाप्पाच्या आगमनाला पाऊस लावणार का हजेरी ? जाणून घ्या

पुणे : विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र सोमवारपासून तो कमी होत असून सर्वत्र हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय आहे. तसेच पूर्व राजस्थान व मध्य प्रदेशात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तेथे अतिवृष्टी सुरू आहे. या तिन्ही राज्यांत 200 ते 350 मि. मी. इतका पाऊस 24 तासांत झाला. त्या भागातून महाराष्ट्रात पाऊस येण्यास थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे 20 पर्यंत राज्यात कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही.

Back to top button