अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हेट स्पीचचे स्वातंत्र्य नव्हे; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्वाळा | पुढारी

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हेट स्पीचचे स्वातंत्र्य नव्हे; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्वाळा

चेन्नई; पुढारी वृत्तसेवा : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला, तरी धर्माचा संबंध येतो तेव्हा हा अधिकार हेट स्पीच देण्यासाठी वापर करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

संबंधित बातम्या : 

तामिळनाडूतील एका शासकीय महाविद्यालयात सनातन धर्माला विरोध या विषयावर विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्यास सांगण्यात आले होते. याबाबत एलन्गोवन यांनी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान न्या. एन. शेषशायी म्हणाले की, सनातन धर्म हा देशाप्रति, पालकांप्रति, गुरुप्रति आणि गरीब व इतरांप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा धर्म आहे. सनातन धर्मात कोठेतरी अस्पृश्यतेबाबत काही असेल, तरी आजच्या काळात त्याला स्थान नाही. राज्यघटनेच्या १७ व्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. न्या. शेषशायी म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला, तरी त्याचा हेट स्पीच देण्यासाठी वापर करता येणार नाही.

हेही वाचा : 

Back to top button