POK on Indian Map : ‘यूएई’च्या उपपंतप्रधानांनी ‘पीओके’ दाखविले भारतात | पुढारी

POK on Indian Map : ‘यूएई’च्या उपपंतप्रधानांनी ‘पीओके’ दाखविले भारतात

शारजा, वृत्तसंस्था : POK on Indian Map : संयुक्त अरब अमिराताचे उपपंतप्रधान सैफ बिन झायद अल नाहयान यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असल्याचे अधोरेखित केले आहे.

भारत-मध्य पूर्व-यूरोप आर्थिक कॉरिडॉरवर नाहयान यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, त्यावर त्यांनी पीओकेसह अक्साई चीनही भारत सरकारप्रमाणे भारताचे भाग असल्याचे दाखविले आहे. पाकिस्तानसह चीनला हा एक मोठा झटका मानला जात आहे.

पीओकेविषयी पाकिस्तान चालवत असलेला प्रपोगंडा अनुत्तीर्ण झाल्याचेच यातून समोर आले आहे. कधी काळी पाकिस्तानशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या यूएईनेही पीओके हा पाकिस्तानचा नव्हे भारताचा भाग असल्याचे आता मान्य केले आहे. काश्मीर विषयावर इस्लामी देशही भारताच्या बाजूने उभे राहात असल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या :

POK on Indian Map : यूएईची काश्मिरात गुंतवणूक

यूएईकडून काश्मीरमध्ये मोठी गुंतवणूक सुरू आहे. दुबईतील एम्मार ही मोठी कंपनी श्रीनगरातील 10 लाख चौरस फुटात व्याप्त मेगा-मॉलमध्ये गुंतवणूक करणारी पहिली विदेशी कंपनी आहे. एम्मारने 2019 मध्ये 370 कलम रद्द झाल्यानंतर हा निर्णय घेतला होता, हे

POK on Indian Map : विशेष! पाकिस्तानचा कांगावा

जी-20 सदस्य देशांनी काश्मिरातील कथित मानवाधिकार उल्लंघनावरून भारताचे कान टोचावेत, असे कुत्सित आवाहन पाकिस्तानने नुकतेच केले होते.

जम्मू-काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचा कांगावा करून येथे जी-20 बैठकीच्या आयोजनालाही पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. अर्थात त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता.

POK on Indian Map : पाकविरोधात पीओकेत बंड

पीओकेमध्ये, अन्नधान्य टंचाई, अवाजवी कर, वीज टंचाई, दुजाभाव आदी कारणांनी लोकांनी पाकविरोधात बंड पुकारलेले आहे. शिया समुदायाने तर कारगिलचे दार उघडा, अशी मागणी खुलेआम केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button