Sanjay Raut on POK : ‘POK स्वतःच भारतात विलीन होईल; पण त्याआधी…’ – संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut on POK : 'POK स्वतःच भारतात विलीन होईल; पण त्याआधी...' - संजय राऊत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sanjay Raut on POK : POK तील जनतेने स्वतःच भारतात सामील होण्याची PM मोदी यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर यावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राजस्थानमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी वाट पाहा POK स्वतःहून भारतात सामील होईल, असे म्हटले आहे. तर यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले POK स्वतःच भारतात विलीन होईल पण आधी…वाचा संपूर्ण प्रतिक्रिया

Sanjay Raut on POK : अखंड भारत आमचे स्वप्न

एएनआयने संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “…आम्ही नेहमीच ‘अखंड भारत’ व्हावे असे स्वप्न पाहिले आहे. आम्ही नेहमी म्हणतो की पीओके आमचे आहे. पण माजी लष्करप्रमुख जेव्हा या पदावर होते तेव्हा त्यांनी POK ला विलीन करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. आता तुम्ही ते कसे करू शकता. तरी त्या दिशेने प्रयत्न झाले तर त्याचे स्वागतच पण त्याआधी…

Sanjay Raut on POK : ….मणिपूरचा प्रश्न सोडवा; चीनच्या कुरापाती आधी संपवा

POK भारतात विलीन करण्यासाठी प्रयत्न करा त्याचे स्वागत आहे. पण त्या आधी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करा. चीन मणिपूरमध्ये पोहोचला आहे. राहुल गांधी म्हणतात, चीन लडाखमध्ये घुसला आहे आणि आमची भूमी ताब्यात घेतली आहे. अरुणाचल प्रदेशचे काही भाग चीनने आपल्या नकाशावर दाखवले आहेत, हे सर्व आधी संपवा. त्यानंतर पीओके स्वतःच भारतात विलीन होईल, तुम्हाला तसे करण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button