सुनील गावस्कर यांनी न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघात सुचवले दोन मोठे बदल | पुढारी

सुनील गावस्कर यांनी न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघात सुचवले दोन मोठे बदल

दुबई : पुढारी ऑनलाईन

टी२० वर्ल्ड कप मध्ये भारताने पाकिस्तानकडून पराभव स्विकारल्यानंतर भारतीय संघावर सर्वस्तरातून टिका होत आहे. भारताच्या अशा लाजिरवाण्या पराभवानंतर क्रीडाप्रेमी चांगलेच नाराज झाले आहेत. तर विश्लेषकांनी संघातील खेळाडूंवर टिका केली आहे. भारतीय खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे भारताविरुद्ध पाकिस्तानने ऐतिहासिक विजय नोंदवला. आता ग्रुप बी मध्ये भारताला पुढील सामन्यात न्यूझीलंडला हरवणे अनिवार्य ठरणार आहे. यामुळे सुनील गावस्कर यांनी संघामध्ये दोन मोठे व महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत.

भारतासाठी जिंकू किंवा मरु अशी अवस्था

टी२० वर्ल्ड कप मधील ग्रुप बी मधील गटात मोठी सुरस निर्माण झाली आहे. पाकिस्तानने भारताला आणि न्यूझीलंडला पराभूत करुन अव्वल स्थानी आहे. पाकिस्तान आता सहजपणे उपांत्य फेरीतील सामन्यात पोहचू शकतो. तसेच अफगानिस्ताने स्कॉटलंड विरुद्ध मोठा विजय संपादन करुन चांगल्या रनरेटसह दोन अंक प्राप्त केले आहे. नामेबीयाने देखिल स्कॉटलंडला पराभूत करुन २ अंक कमावले आहेत. आता ग्रपु बी मधील अंकतालिकेत न्युझीलंड आणि भारत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. न्यूझीलंडने देखिल पाकिस्तानकडून पराभव स्विकारल्याने त्यांना देखिल पुढील सामाना जिंकू किंवा मरु अशा अवस्थेतील असणार आहे. दोन्ही पैकी कोणता संघ जिंकेल त्याला उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थीतत भारताला न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. अन्यथा परतीचा प्रवास सुरु होईल.

भारताची सुमार गोलंदाजी

खरतर भारतीय गोलंदाजीचा मारा सध्याच्या घडीला सर्वात दर्जेदार असा मानला जातो. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात हा गोलंदाजांचा ताफा अधिक दर्जेदार आहे. जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे जलतगती गोलंदाज सध्या जगभरात सर्वोत्तम मानले जातात. पण या गोलंदाजीचे उट्टे पाकिस्तानने मागील सामन्यात काढले. संपूर्ण २० षटकात भारताच्या गोलंदाजीच्या ताफ्याला एक देखिल बळी मिळवता आला नाही.

फलंदाजांची हाराकीरी

भारताची गोलंदाजी जशी भक्कम समजली जाते तसेच भारताची फलंदाजी देखिल अत्यंत मजबूत मानली जाते. या टी२० प्रकारात  भारतीय फलंदाज स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. आयपीएलमध्ये खेळून भारतीय खेळाडूंना या प्रकाराचा चांगला अनुभव असल्याचे मानले जाते. पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी देखिल पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली.

उपकर्णधार व पुढील काळात संघाचा कर्णधार बनणाऱ्या रोहित शर्माला संघातून बाहेर ठेवले जावे अशी टिका देखिल समाज माध्यमातून क्रीडाप्रेमी करु लागले आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहूल, सूर्यकुमार यादव, हार्दीक पंड्या या फलंदाजांनी मोठी निराशा केली. कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्या खेळीमुळे भारताने सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. आता या फलंदाजांची चिंता देखिल भारताला सतावू शकते.

सुनील गावस्कर यांचा बहुमोल सल्ला

माजी कर्णधार व जेष्ठ समालोचक सुनील गावस्कर यांनी भारतीय संघात पुढील सामन्याच्या दृष्टीने दोन मोठे बदल सुचवले आहेत. सुनील गावस्करांनी असे म्हटले आहे की, हार्दीक पंड्या हा सामन्यात गोलंदाजी करु शकणार नाही. कारण या पुर्वी त्याने गोलंदाजी अथवा त्याचा सराव केलेला नाही. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा खांदा दुखवला गेला होता. हार्दीकचा सध्या फार्म देखिल चांगला नाही म्हणून त्याला पर्याय म्हणून संघात इशान किशन यास खेळवले गेले पाहिजे. इशान किशनने आयपीएलमध्ये व या वर्ल्डकप मधील सराव सामन्यात चांगल्या धावा केल्या होत्या. म्हणजे त्याचा फाॅर्म चांगला आहे त्यामुळे हार्दीक ऐवजी इशानला खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे.

तसेच गोलंदाज भूवनेश्वर कुमार याचा फाॅर्म चांगला नसल्याचे सातत्याने दिसून आहे. आयपीएल मध्ये देखिल भूवनेश्वरला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने सर्वाधिक धावा दिल्या होत्या. त्यामुळे भूवनेश्वर ऐवजी शार्दुल ठाकूर याला संधी दिली गेली पाहिजे, असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

Back to top button