Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांना नवीन नियुक्त्या - पुढारी

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांना नवीन नियुक्त्या

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील १८ पोलीस उपायुक्तांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात मुंबईत बदली करण्यात आलेल्या ०५ पोलीस उपायुक्तांना नियुक्ती देण्यासोबत तात्पुरत्या नियुक्तीवर असलेल्या ०६ आणि सध्या कार्यरत असलेल्या ०७ अधिकार्‍यांचा समावेश आहे.

तसेच, पोलीस उपायुक्त शाम घुगे यांना सशस्त्र पोलीस मरोळ येथे तात्पुरती नेमणूक दर्शविण्यात आली होती. त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश नंतर काढण्यात येणार आहेत असे पोलीस मुख्यालयाने स्पष्ट केेले आहे.

Mumbai Police : सगळ्यांच्या नियमीत नियुक्त्या करण्यात आल्या

मुंबई पोलीस दलात बदली झालेल्या सुनिल पी. भारद्वाज यांची सशस्त्र पोलीस बल (मरोळ), नितीन पवार यांची वाहतूक विभाग (पश्‍चिम), प्रज्ञा जेडगे यांची वाहतूक विभागात (दक्षिण), महेश चिमटे यांची संरक्षण विभाग आणि निलोत्पल यांची गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण विभाग एक येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकार्‍यांमधील हरी बालाजी यांची परिमंडळ एक, महेश पंडीत यांची आर्थिक गुन्हेशाखेत (एसटीएफ), श्रीकृष्ण कोकाटे यांची सशस्त्र पोलीस दल (ताडदेव), हेमराज अंबरसिंग रजपूत यांची सशस्त्र पोलीस दल (कोळे-कल्याण), राज तीलक रोशन यांची वाहतूक विभागात (मध्य) आणि संजय लाटकर यांची यांची सुरक्षा विभागात यांना नियमित नियुक्ती देण्यात आली आहे.

विवीध अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि ठिकाणे

संशक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची परिमंडळ दोन, परिमंडळ १२ चे उपायुक्त डी. एस. स्वामी यांची परिमंडळ आठ, परिमंडळ आठचे उपायुक्त मंजुनाश शिंगे यांची परिमंडळ नऊ, वाहतूक विभागातील (पश्‍चिम) उपायुक्त सोमनाथ घार्गे यांची परिमंडळ १२, वाहतूक विभागातील (दक्षिण) उपायुक्त योगेश गुप्ता यांची मुंबई पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय दोन, मुख्यालय दोन येथील उपायुक्त गिता चव्हाण यांची बंदर परिमंडळ आणि परिमंडळ एकचे उपायुक्त शशीकुमार मिना यांची सशस्त्र पोलीस दल (नायगाव) येथे बदली करण्यात आली आहे.

Back to top button