पेट्रोल दराने मुंबईत ११४ रुपयांची पातळी ओलांडली | पुढारी

पेट्रोल दराने मुंबईत ११४ रुपयांची पातळी ओलांडली

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कंपन्यांनी सलग दुसर्‍या दिवशी गुरुवारी इंधन दरात वाढ केली. पेट्रोल व डिझेल दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल दराने 114 रुपयांची पातळी ओलांडली आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर 83 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. तर, डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचे दर 81 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत.

मात्र, असे असले तरी तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. मुंबईत पेट्रोलचे लिटरचे दर 114.14 रुपयांवर आले असून, डिझेलचे दर 105.12 रुपयांवर आले आहेत. दिल्‍लीमध्ये पेट्रोलचे दर 108.29 रुपयांपर्यंत वाढले असून, डिझेलचे दर 97.02 रुपयांवर आले आहेत.

सतत सुरू असलेल्या इंधन दरवाढीने महागाई भडकत चालली असून, भाज्या कडाडल्याच आता खासगी आणि एसटीचा प्रवासही महागला आहे.

Back to top button