Indian Economy | भारत २०७५ मध्ये अमेरिका, जपानलाही मागे टाकत नंबर २ ची अर्थव्यवस्था बनेल!; रिपोर्टमधील माहिती | पुढारी

Indian Economy | भारत २०७५ मध्ये अमेरिका, जपानलाही मागे टाकत नंबर २ ची अर्थव्यवस्था बनेल!; रिपोर्टमधील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत २०७५ पर्यंत जपान, जर्मनी आणि अमेरिका या देशांना मागे टाकत जगातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज गोल्डमन सॅक्सने व्यक्त केला आहे. गोल्डमन सॅक्स (Indian Economy) ही जगातील सर्वांत मोठी आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीने जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती सांगणारा अहवाल जाहीर केला केला आहे. यानुसार भारत २०७५ मध्ये सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था बनेल; असे म्हटले आहे.

गोल्डमन सॅक्सने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, २०७५ पर्यंत भारताच्या १.४ अब्ज लोकसंख्येसह अर्थव्यवस्थेतही वाढ अपेक्षित आहे. दरम्यान भारत अमेरिकेला मागे टाकत भारताच्या जीडीपीत ५२.५ ट्रिलियन डॉलरह वाढ होऊन भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. तसेच चीनची अर्थव्यवस्था ५७ ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर असणार आहे. दरम्यान, भारताने मागे टाकलेल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था ५१.५ ट्रिलियन डॉलरसह तिसऱ्या स्थानावार असेल. युरोपीयन क्षेत्र ३०.३ ट्रिलियन डॉलरसह चौथ्या तर जपान ७.५ ट्रिलियन डॉलरसह पाचव्या स्थानावर (Indian Economy) असणार आहे.

Indian Economy: ‘या’ कारणांमुळे भारत जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर

या अहवालानुसार, भारत लोकसंख्या वाढीसह तांत्रिक नवकल्पना, वाढलेली गुंतवणूक आणि कामगारांची वाढती उत्पादकता यासारख्या घटकांमुळे भारत जागतिक आर्थिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर पोहचू शकतो, असे गोल्डमन सॅक्सने दिलेल्या अवहालात म्हटले आहे. याव्यतिरिक्त इन्व्हेस्को ग्लोबल सॉवरेन अॅसेट मॅनेजमेंटने केलेल्या अभ्यासातून देखील भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनेल असे सांगण्यात आले आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की, भारतातील सुधारित स्थिरता, अनुकूल लोकसंख्याशास्त्र, नियामक उपक्रम आणि अनुकूल वातावरणामुळे भारत हा चीनला मागे टाकून गुंतवणुकीसाठी सर्वोच्च उदयोन्मुख बाजारपेठ बनेल (Indian Economy)  असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Indian Economy: २०२२-२३ या अर्थिक वर्षात जीडीपीत तब्बल इतकी वाढ

जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत सध्या भारत पाचव्या स्थानी आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांसारखे देश आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी दिसून येत आहे. दरम्यान राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) ताज्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या अर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत तब्बल ७.२ टक्के वाढ झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button