Nepal Flood | नेपाळमध्ये पूर, भूस्खलनामुळे हाहाकार, ५ मृत्यू, २८ बेपत्ता

Nepal Flood | नेपाळमध्ये पूर, भूस्खलनामुळे हाहाकार, ५ मृत्यू, २८ बेपत्ता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : नेपाळच्या पूर्व भागात (Eastern Nepal) अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २८ जण बेपत्ता आहेत. गेल्या आठवड्यात या भागात पावसाला सुरुवात झाली होती. पूर्व नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यातील हेवा नदीवर उभारण्यात येत असलेला जलविद्युत प्रकल्प मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. या दुर्घटनेत १६ कामगार बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती सरकारी अधिकारी बिमल पौडेल यांनी दिली आहे. (Nepal Flood)

"पोलिस बेपत्ता मजुरांचा शोध घेत आहे," असेही त्यांनी म्हटले आहे. पूर्वेकडील भागात भारताच्या सीमेला लागून असलेल्या तपलेजुंग आणि पंचथर जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनात ९ जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंचथर जिल्ह्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे मेची महामार्गावरील दोन पुलांचे नुकसान झाले आहे. दुर्गम तपलेजुंग जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. येथील चार लोक बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे बचाव कर्मचार्‍यांना डोंगराळ सिडिंगवा गावात पोहोचता आलेली नाही.

नेपाळमध्ये साधारणपणे जूनच्या मध्यावधीला पाऊस सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत तो कायम राहतो. चीन आणि भारत दरम्यान वसलेल्या बहुतांश नेपाळच्या पर्वतीय भागात दरवर्षी अनेक गावे, शेतपिके आणि पायाभूत सुविधांचे पावसामुळे नुकसान होतो. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होतो. (Nepal Flood)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news