Ashadhi wari : भरभरून पाऊस पडू दे.. रान हिरवेगार होऊ दे ! भाविकांचे नाथांना साकडे | पुढारी

Ashadhi wari : भरभरून पाऊस पडू दे.. रान हिरवेगार होऊ दे ! भाविकांचे नाथांना साकडे

मढी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शनिअमावास्येनिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या हाजारो भाविकांनी आज मढी येथे चैतन्य कानिफनाथ व मायंबा येथे मच्छिद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. नाथांच्या जयकारांने मंदीर परिसर दुमदुमला. मढी-मायंबा वृद्धेश्वरकडे येणारे सर्व रस्ते गर्दींनी फुलून गेले होते. पाससाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत असून, ‘भरभरून पाऊस पडू दे.. अन् शेतकर्‍याचे राण हिरवेगार होऊ दे..’, अशी विनवणी करत भाविकांनी नाथानां साकडे घातले.

अमवस्येनिमीत्त मढी -मायंबा येथे पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, पनवेल, संगमनेर, बीड, आष्टीसह मराठवाड्यातून भाविकांनी मोठी गर्दी होती. अमवस्येनिमीत्त येणारे सर्व नाथ भक्त मढी मायंबा वृध्देश्वर या ठिकाणी दर्शन घेतात. शनि अमावस्या असल्याने मढी देवस्थान समितीतर्फ योग्य नियोजन करण्यात आले.

पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटुकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. मढी ते तिसगाव व सावरगाव ते मायंबा रस्ताची दयनीय अवस्था झाल्याने रस्तातील खड्डे व मातीची धुळीचा भाविकांना प्रंचड त्रास झाला. मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, शामराव मरकड, रवींद्र आरोळे, मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी येणार्‍या भाविकांचे स्वागत केले.

आज कानिफनाथ दिंडीचे प्रस्थान

कानिफनाथांच्या दिंडीची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, राज्यात प्रसिद्ध मढी येथील चैतंन्य कानिफनाथ दिंडीचे पंढरपूकडे आषाढीवारीसाठी रविवारी (ता.18) सकाळी नऊ वाजता गडावरून प्रस्थान होईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन मरकड यांनी दिली. मढी येथे ग्रामस्थ नाथभक्तांच्या उपस्थित सकाळी नऊ वाजता नाथांची आरती, पादुका पूजन, अभिषेक करून नाथसंप्रदयाच्या परंपरे प्रमाणे कानिफनाथ दिंडीचे गडावरून प्रस्तान होईल. कानिफनाथ दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे, आवाहन देवस्थान समितीने केले.

हेही वाचा

मान्सूनच्या पावसावर पडले अंदाजांचे पाणी; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

शेवगाव तालुका : बिनशेती आदेश प्रकरण; दोषींवर गुन्हे दाखल करा

सरुड येथे बिरोबाचा माळ परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण

Back to top button