बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस : कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ - पुढारी

बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस : कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ

कागल; पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस देण्याची घोषणाराज्याचे ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. हा बोनस येत्या दिवाळीसाठी पाच हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते कागल येथे बोलत होते. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनाच्या वतीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासमोर बोलताना मुश्रीफ यांनी घोषणा केली.

दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस देणार असल्याचे जाहीर केल्याने मोर्चातील कामगारांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रातल्या बांधकाम कर्मचाऱ्यांना यापूर्वी कामगार कल्याण मंत्री असताना मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. आत्ता देखील कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन लवकरच कामगारांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या बाबत विचार केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचलत का?

 

Back to top button