किलर व्हेलला लवकरच मिळणार नेहमीचा अधिवास | पुढारी

किलर व्हेलला लवकरच मिळणार नेहमीचा अधिवास

न्यूयॉर्क : अमेरिकेतील लोलिता एक ओर्का असून त्याचा अर्थ आहे. किलर व्हेल आहे. 1970 मध्ये हा महाकाय मासा सिएटलजवळ पकडण्यात आला होता. स्थानिक अमेरिकी व्हेलला टोकिटे म्हणतात. तो तेव्हापासून आजपर्यंत कैद होता. आता तिच्या स्वातंत्र्याचे दिवस जवळ आले आहेत. लवकरच लोलिताला मोकळ्या समुद्रात म्हणजेच तिच्या नैसर्गिक निवासस्थानी सोडण्यात येणार आहे.

लोलिताला फ्लोरिडाच्या सी अ‍ॅक्वेरियममध्ये ठेवले आहे. रोज हजारो लोक तिला बघायला येतात. लोलिताचे वजन 2268 किलो असून वय आहे 57 वर्षे. आता तिचे अ‍ॅक्वेरियममधील सादरीकरण बंद करण्यात आले आहे. पुढच्या दोन वर्षांत तिला प्रशांत महासागरात सोडण्यात येईल.

लोलिताला मोकळ्या समुद्रात सोडण्यासाठी अमेरिकी सरकारची परवानगी घेतली जात आहे. मियामी-डेड काऊंटीचे महापौर डॅनिएला लेविन काव्हाने यांनी सांगितले की, लोलिताला समुद्रात सोडण्याआधी अनेक प्रकारचे कागदपत्र करावे लागणार आहे. सगळ्यात पहिले अ‍ॅक्वेरियमचा मालकी हक्क डॉल्फिन कंपनीला द्यायला हवा. ही कंपनी एका खासगी संस्थेच्या सोबत मिळून व्हेल माशांचा इलाज करते.
लोलिता आता ज्या अ‍ॅक्वेरियममध्ये आहे त्याचा मालक यानी सीवर्ल्ड एंटरटेनमेंट ने 2016 मध्ये किलर व्हेल्सवर परफॉर्मन्स करणे बंद केले होते. एकेकाळी लोलिता अ‍ॅक्वेरियमची सर्वात आवडती होती.

संबंधित बातम्या

डॉल्फिन कंपनीने म्हटले आहे की, लोलिताच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही मियामी सी-अ‍ॅक्वेरियम खरेदी करण्याचे ठरवले. तिला मोकळ्या समद्रात सोडण्याची मोहिम 2013 पासून वेगात सुरू झाली. त्यावेळी एक ब्लॅकफीश नावाची डॉक्युमेंट्री प्रसिद्ध झाली होती. या डॉक्युमेंट्रीमध्ये ओर्का किलर व्हेल्स ला कैद ठेवण्यावर विरोध झाला. त्यांचे तोटे सांगण्यात आले होते.

किलर व्हेल्सची शिकार समुद्रातील कोणताही जीव करत नाही. म्हणूनच ते आरामात 80 वर्षे जगू शकतात. समुद्री डॉल्फिनच्या 35 प्रजातींपैकी ही एक आहे. ती साधारण 20 ते 26 फूट लांब असू शकते. सगळ्यात लांब ओर्का किलर व्हेल 32 फूटची होती. तिचे वजन 10 टन होते. यांची पिल्ले जन्मतःच 180 किलो वजनाची आणि 8 फूट लांब असतात.

Back to top button