

चीनने अंतराळात आण्विक शस्त्र घेवून जाण्यासाठी सक्षम हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. या परिक्षणाने चीनने आपल्या अंतराळ शक्तीचे एका अर्थाने प्रदर्शनच केले आहे. ब्रिटिश वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सने शनिवारी सांगितले की, ही चाचणी ऑगस्ट महिन्यात केली आहे.
बीजिंगने ऑगस्ट महिण्यात एक परमाणू सक्षम मिसाईलची चाचणी घेतली. जे आपल्या लक्षाच्या केवळ ३२ किमी अंतरावर जाऊन पडले. याआधी चीनने परमाणू शस्त्राला घेवून जाण्यासाठी सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राला अंतराळात पाठवले. जे सुरूवातीला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फेऱ्या मारत राहिले. यानंतर ते आपल्या लक्ष्याच्या दिशने हायपरसोनिक स्पीडने पुढे गेले.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार हायपरसोनिक ग्लाइड वाहनाला लॉग मार्च रॉकेट व्दारे नेण्यात आले.
चीनकडून कुठल्याही परिक्षणाच्या आधी त्याची घोषणा हाेत असते. मात्र यावेळी चीनने या परिक्षणाबद्दल कमालीची गुप्ताता पाळली होती.
या अहवाला मध्ये म्हटलंय की, हायपरसोनिक शस्त्रांवर चीनच्या प्रगतीने अमेरिकेच्या गुप्तचर एजन्सींना बुचकळ्यात टाकले आहे. चीनच्या शिवाय अमेरिका, रशिया आणि कमीत-कमी पाच देश हायपरसोनिक तंत्रज्ञानावर काम करत आहेत.
हायपरसोनिक क्षेत्रणास्त्र, पारंपारिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रा प्रमाणेच शस्त्रे पोहचवू शकतात. मात्र याचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पटीने अधिक असतो. हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे लक्षापर्यंत अधिक वेगाने पोहचू शकते.