Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसची ईडीच्या चौकशीला पुन्हा दांडी - पुढारी

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसची ईडीच्या चौकशीला पुन्हा दांडी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्या कोट्यावधी रुपयांच्या हवाला प्रकरणाच्या चौकशीसाठी
सक्‍तवसुली संचलनालयाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ( Jacqueline Fernandez ) शनिवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, जॅकलिन फर्नांडिसने सलग तिसर्‍यांदा ईडीच्या चौकशीला दांडी मारली आहे.

गेल्याच आठवड्यात या प्रकरणात ईडीने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही व जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez )  समन्स बजावले होते. ईडीने नोराची सलग आठ तास चौकशी केली होती. तर जॅकलिन चौकशीला ईडी कार्यालयात पोहेचली नव्हती.

यानंतर जॅकलिनने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत उटी येथे एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याचे कारण सोशल मीडियावर सांगितले होते.

काय आहे प्रकरण?

सुकेश चंद्रशेखर व त्याची भागीदार लीना पॉल यांनी फोर्टिस समुहाचा सर्वेसर्वा शिवइंदर सिंग व त्याची पत्नी आदिती सिंग यांची सुमारे दोनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हवालाच्या माध्यमातून त्याने हा पैसा फिरविला असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे.

जॅकलिन आणि नोरा यांचा लीना पॉलशी संपर्क असल्याचे दिसून आल्यानंतर जबाब नोंदविण्यासाठी ईडीने दोघींना समन्स बजावले होते.

हेही वाचलंत का?

पाहा व्हिडिओ : माझ्या हाती तलवार दिली तर मी कोविडवर वार करेन : अभिनेत्री गिरीजा प्रभू 

Back to top button