

निसर्गाची देण लाभलेल्या केरळमध्ये (kerala rain) कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच आता परतीच्या पावसाने अक्षरश: तांडव केले आहे. केरळच्या अनेक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान आज आणि उद्या राज्यात पाऊस थैमान घालण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळच्या काही भागात मुसळधार पावसामुळे इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे. हवामान विभागाने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्रावणकोर देवासम मंडळाने भगवान अयप्पाच्या भक्तांना 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी सबरीमाला मंदिरात जाण्यापासून टाळण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पंबा नदीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीपर्यंत वाढत आहे.
हे ही वाचलं का?