भवरी देवी खून, सेक्स स्कँडल प्रकरणातील माजी मंत्री महिपाल मदेरना यांचा मृत्यू | पुढारी

भवरी देवी खून, सेक्स स्कँडल प्रकरणातील माजी मंत्री महिपाल मदेरना यांचा मृत्यू

जोधपूर, पुढारी ऑनलाईन

राजस्थानच्या राजकारणात भूकंप निर्माण करणाऱ्या भवरी देवी अपहरण आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी माजी मंत्री महिपाल मदेरना ( ६९) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मदेरना गंभीर आजाराशी लढा देत होते. आज सकाळी पावणेआठ वाजता त्यांचे निधन झाले.

अशोक गेहलोत सरकारमध्ये मदेरना कॅबिनेट मंत्री होते. भवरीदेवी या महिलेचे अपहरण करून तिची हत्या करण्‍यात आली होती. या प्रकरणी मदेरना यांचे नाव आले. यानंतर त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्‍टी करण्‍यात आली हाेती. या प्रकरणातील ते मुख्य संशयित आरोपी होते. सध्या ते जामिनावर होते.

राजस्थान काँग्रेसवर वर्चस्व असलेल्या परसराम मदेरना यांचे पुत्र असलेल्या महिपाल मदेरना यांची राजकीय कारकीर्द भवरी देवी प्रकरणामुळे झाकोळून गेली. गेहलोत सरकारमध्ये मदेरना जलसंपदा मंत्री होते.

भंवरी देवी अपहरण आणि हत्या प्रकरणात मदेरना १० वर्षे तुरुंगात होते. ते मंत्री असतानाच त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना कर्करोगावरील उपचारासाठी तुरुंगातून जामीन मिळाला होता.

भवरी देवी खून प्रकरणातील मदेरना…

काँग्रेस नेते महिपाल मदेरना यांचा जन्म ५ मार्च १९५२ रोजी झाला. जय नारायण व्यास विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर ते राजकारणात उतरले. राजस्थान काँग्रेसमधील बडे प्रस्थ म्हणून मदरेना यांच्याकडे पाहिले जात होते. सध्या त्यांची मुलगी दिव्या मदेरना ओसियनमधून आमदार आहे. तर पत्नी जोधपूर काँग्रेसची जिल्हाध्यक्ष आहे.

भवरी देवी खून  मदेरना यांनी का केला?

जोधपूरमधील एका गावातील उपकेंद्रात सहायक नर्स असलेल्या भवरी देवीशी मदेरना यांचे अनैतिक संबंध होते. त्याची सीडी व्हायरल झाल्यानंतर २०११ मध्ये एक दिवस अचानक ती गायब झाली. त्यानंतर तिचा पती अमरचंद याने तत्कालिन जलसंपदा मंत्री महिपाल मदेरना यांच्यावर आरोप केला. भवरी देवी आणि मदेरना यांची सीडी व्हायरल झाल्याने राजस्थानच्या राजकारणात भूकंप झाला होता. अपहरणानंतर तिची हत्या झाल्याचे समोर आले. या प्रकरणाने राजकीय रंग घेतल्यानंतर मदेरना यांनाही अटक झाली.

हेही वाचलं का?

Back to top button