Pakistan : पाकिस्तानात मौलवीचा लहान मुलावर बलात्कार | पुढारी

Pakistan : पाकिस्तानात मौलवीचा लहान मुलावर बलात्कार

लाहोर; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात शहरामध्ये एका मौलवीने अल्पवयीन मुलाला रमजानच्या पार्श्वभूमीवर दुवा पढण्याच्या बहाण्याने मशिदीत बोलावून त्याचा रात्रभर लैंगिक छळ केला. पोलिसांनी मौलवी मोहम्मद रियाजविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (Pakistan)

घटना 9 आणि 10 मार्चदरम्यानच्या रात्रीची असून, मौलवीने मुलाला खाण्यातून झोपेचे औषध दिले. रात्रभर त्याच्यासोबत दुष्कर्म केले. सकाळी 8 वाजता उठल्यानंतर मुलगा वेदनांनी विव्हळत होता. (Pakistan)

मौलवीला त्याने जाब विचारला असता मौलवीने त्याला मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. अखेर ही बाब मुलाने कुटुंबाला सांगितल्यानंतर मौलवीविरोधात गुन्हा दाखल झाला.

मौलवीवर अधिक विश्वास म्हणून पीडित मुलाने व्हिडीओच बनविला

2021 मध्ये लाहोरच्या एका मदरशातील मौलवीने एका मुलासोबत दुष्कर्म केले होते. मुलाने त्याबाबत तक्रार केली, तेव्हा कुणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. मग मुलाने त्याच्यासोबत मौलवी करत असलेल्या दुष्कर्माचा व्हिडीओच बनविला.

हेही जाणून घ्या…

एका अहवालानुसार पाकिस्तानात दररोज किमान 8 मुलांना लैंगिक छळाचा सामना करावा लागतो

अधिक वाचा :

Back to top button