Coronal Holes On Sun's Surface : सूर्यावर पडले पृथ्वीहून मोठे भगदाड; जाणून घ्या आपल्यावर काय होणार परिणाम | पुढारी

Coronal Holes On Sun's Surface : सूर्यावर पडले पृथ्वीहून मोठे भगदाड; जाणून घ्या आपल्यावर काय होणार परिणाम

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : अंतराळ शास्त्रज्ञांना सूर्याच्या पृष्ठभागावर एक भले मोठे छिद्र सापडले आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या मते, या छिद्राचा आकार आपल्या पृथ्वीपेक्षा २० पट मोठा आहे. या छिद्राला ‘कोरोनल होल’ असे म्हणतात. हे एका काळ्या आणि गडद छिद्रासारखे दिसते जिथून सूर्यप्रकाश नाहीसा झाला आहे. सूर्यप्रकाशातील हे मोठे छिद्र पाहता, यूएस फेडरल एजन्सी NOAA ने भूचुंबकीय वादळांचा इशारा दिला आहे. सूर्याच्या या छिद्रातून सौर वारे ताशी २९ लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहेत, जे शुक्रवारी (दि.३१) पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. (Coronal Holes On Sun’s Surface)

कोरोनल होलचा पृथ्वीवर काय परिणाम होतो? (Coronal Holes On Sun’s Surface)

अहवालानुसार, या सौर वाऱ्यांचा आपल्या ग्रहावर काय प्रभाव पडतो याचे मूल्यांकन करण्यासाठी परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे. सूर्यापासून चार्ज केलेल्या कणांचा सतत प्रवाह पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, उपग्रह, मोबाईल फोन आणि जीपीएसवर परिणाम करू शकतो. NASA च्या Solar Dynamics Observatory (SDO) ला २३ मार्च रोजी सूर्याच्या दक्षिण ध्रुवाजवळ एक कोरोनल होल सापडला. हे छिद्र सौर वारा (किंवा भूचुंबकीय वादळ) अधिक सहजपणे अंतराळात आणतात. प्रभावानुसार, त्यांना G१ ते G५ असे रेटिंग दिले जाते.

भूचुंबकीय वादळात पृथ्वी अडकू शकते

नासाच्या गोडार्डच्या हेलिओफिजिक्स सायन्स डिव्हिजनचे अॅलेक्स यंग यांनी बिझनेस इनसाइडरला सांगितले की सध्याचे कोरोनल होल खूप मोठे आहे. त्याची लांबी 300,000 आणि रुंदी 400,000 किमी आहे. त्यात एकामागून एक 20 ते 30 पृथ्वी सामावू शकतात. अशा परिस्थितीत या छिद्रातून बाहेर पडणाऱ्या सौर वादळाचे प्रमाणही खूप जास्त असेल.

कोरोनल होल म्हणजे काय ?

नासाच्या म्हणण्यानुसार, सूर्याच्या पृष्ठभागावरील कृष्णविवराला कोरोलन होल म्हणतात. हे सूर्याच्या पृष्ठभागावर गडद भाग म्हणून दिसतात. कारण हे प्रदेश त्यांच्या सभोवतालच्या प्लाझ्मापेक्षा थंड आणि कमी दाट आहेत. हे भूचुंबकीय वादळे निर्माण करतात, जे अंतराळातून वेगवेगळ्या ग्रहांशी टक्कर देतात. कधीकधी ते पृथ्वीच्या दिशेने वाहतात.

अधिक वाचा :

Back to top button