Daniel Mookhey : ऑस्ट्रेलियाच्या खजिन्याची चावी भारतीयाच्या हातात; डॅनियल मुखे यांनी घेतली गीतेची शपथ | पुढारी

Daniel Mookhey : ऑस्ट्रेलियाच्या खजिन्याची चावी भारतीयाच्या हातात; डॅनियल मुखे यांनी घेतली गीतेची शपथ

सिडनी; पुढारी ऑनलाईन : भारतीय वंशाचे डॅनियल मुखे हे ऑस्ट्रेलियातील कोणत्याही राज्याचे कोषाधिकारी बनणारे पहिले राजकारणी ठरले आहेत. त्यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्याचे कोषाधिकारी म्हणून शपथ घेतली. त्यांनी हिंदू धर्मातील पवित्र गीतेवर हात ठेऊन निष्ठेची शपथ घेतली. (Daniel Mookhey)

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, डॅनियल मुखे यांनी न्यू साउथ वेल्स (NSW) प्रीमियर ख्रिस मिन आणि इतर सहा मंत्र्यांसह शपथ घेतली. भारतीय वंशाच्या डॅनियल्स यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी न्यू साउथ वेल्स या महान राज्याचे कोषाधिकारी म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी त्यांनी एनएसडब्ल्यूच्या लोकांचे आभारही मानले. आम्हाला हा सन्मान आणि विशेषाधिकार सोपवल्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले. (Daniel Mookhey)

डॅनियल मुखे आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की भगवतगीतेवर निष्ठेची शपथ घेणारा मी पहिला ऑस्ट्रेलियन मंत्री आहे. हे केवळ शक्य आहे कारण ऑस्ट्रेलिया हा एक मुक्त विचारांचा देश आहे आणि माझ्या पालकांसारख्या लोकांच्या योगदानाचे स्वागत करतो. ते म्हणाले की, आज मी शपथ घेत असताना माझ्या मनात अशा अनेक गोष्टी सुरू होत्या. (Daniel Mookhey)

२०१५ मध्ये, स्टीव्ह वॉनच्या जागी, न्यू साउथ वेल्सच्या वरच्या सभागृहात लेबर पार्टीने मुखे यांची निवड केली. मुखे हे न्यू साउथ वेल्समधील भारतीय पार्श्वभूमीचे पहिले नेते आहेत. तसेच भगवत गीतेवर हात ठेऊन निष्ठेची शपथ घेणारे ते ऑस्ट्रेलियातील पहिले व्यक्ती आहेत. या पुर्वी २०१९ मध्ये त्यांना वित्त आणि लघु व्यवसायाचे शॅडो मंत्री आणि गिग अर्थव्यवस्थेचे शॅडो मंत्री बनवण्यात आले होते.

डॅनियल मुखीचे आई-वडील १९७३ मध्ये पंजाबमधून भारतात येऊन ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. डॅनियल मुखे यांचा जन्म ब्लॅकटाउनच्या उपनगरात झाला. त्यांचे बालपण सिडनीमध्ये गेले, तो काळ त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात सध्या ६,८०,००० हून अधिक हिंदू राहतात. तसेच, ऑस्ट्रेलियातील हिंदू धर्म हा देशातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे.

अधिक वाचा :

Back to top button