Latest
US News : जॉर्जियामध्ये हाऊस पार्टीत बेछूट गोळीबार; २ ठार, ६ जखमी
पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉर्जियामधील (अमेरिका) एका हाऊस पार्टीमध्ये शनिवारी (दि.६) झालेल्या बेछूट गोळीबारात दोन मुले ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. या पार्टीत १०० पेक्षा जास्त किशोरवयीन मुल-मुली सहभागी झाले होते. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार हा गोळीबार हाऊस पार्टीमध्ये झालेल्या भांडणातून झाला. वाचा सविस्तर बातमी. (US News)
माहितीनूसार, जॉर्जियातील डग्लसविले येथील एका घरात पार्टी सुरु होती. घर मालकाने आपल्या १६ वर्षीय मुलीसाठी एक पार्टी आयोजित केली होती. १०० पेक्षा जास्त मुले यासाठी आली होती. पण उपस्थितांपैकी काहीजण गांजा ओढू लागले आणि अचानक पार्टीतील भांडणावरुन बेछूट गोळीबार झाला. यात दोघेजण जागीच ठार झाले तर सहाजण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेले दोघेजण हे १८ वर्षाखालील आहेत. गोळीबार झाला तेव्हा प्रौढ उपस्थित होती की नाही हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेलं नाही.
हेही वाचा
- युद्ध आम्ही नव्हे, तर युक्रेनने सुरू केले; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दिल्लीत आरोप
- Medical Diplomacy : भारताकडून चीनला मोठा दणका; वैद्यकीय उपकरणे जपानमधून हाेणार आयात
- Allahabad HC on cow slaughter : 'गायींना मारणारा नरकात जातो', 'गो हत्या बंदी'चा कायदा करा – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद
- Rahul Gandhi@Cambridge: केंब्रिजमधील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर 'भाजपचा हल्लाबोल'…बदनाम करणे ही सवयच'

