Medical Diplomacy : भारताकडून चीनला मोठा दणका; वैद्यकीय उपकरणे जपानमधून हाेणार आयात | पुढारी

Medical Diplomacy : भारताकडून चीनला मोठा दणका; वैद्यकीय उपकरणे जपानमधून हाेणार आयात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मेडिकल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारताने मोठा व धोरणात्मक निर्णय घेतला असून, वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वैद्यकीय उपकरणे जपानमधून आयातही केली जाणार असून, भारत सरकारच्या या निर्णयाने चिनी कंपन्यांना कोट्यवधी डॉलरचा फटका बसणार आहे.

जपानी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत जम बसवण्याची संधी यातून मिळेल. चिनी वैद्यकीय उपकरणे स्वस्त असली तरी टिकाऊ नसतात. जपानमधील उपकरणे ही उच्च दर्जाची आहेत.

जी-20 परिषदेदरम्यान झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या विषयावर निर्णायक चर्चा होऊन जपानने भारताच्या गरजांची पूर्तता करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.

चीनमधून अशी कमी करणार आयात

भारत सध्या जपानमधून दरवर्षी 131 दशलक्ष डॉलरची (1 हजार 66 कोटी रुपये) वैद्यकीय उपकरणे मागवतो.
चीनमधून 900 दशलक्ष डॉलरची (7,380 कोटी रुपये) उपकरणे आयात केली जातात.
येत्या 5 वर्षांत चीनमधून उपकरणांची आयात 130 दशलक्ष डॉलर (1,066 कोटी रुपये) तर जपानमधून 900 दशलक्ष डॉलरची (7,380 कोटी रुपये) करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.

Back to top button