पुढारी ऑनलाइन डेस्क : Allahabad HC on cow slaughter : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्राला संरक्षित राष्ट्रीय प्राणी घोषित करून गो हत्या बंदीसाठी केंद्रीय कायदा तयार करण्यास सांगितले आहे. गोवंश हत्येचा आरोप असलेल्या एका व्यक्तीच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी यावेळी पंचगव्य आदि गोष्टींचा उल्लेख करत हिंदू धर्माची गायींबाबत असलेल्या श्रद्धेचा दाखला देत धर्मनिरपेक्ष देशात सर्व धर्मांचा आदर व्हायला हवा हे अधोरेखित केले. यावेळी हिंदू धर्मात गायींचे सांगितलेल्या महत्वाबाबत त्यांनी पाढाच वाचला. टाइम्स ऑफ इंडियाने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
गोहत्या केल्याचा आणि मांस विक्रीसाठी नेल्याचा आरोप असलेल्या बाराबंकीच्या मोहम्मद अब्दुल खालिक यांच्यावरील फौजदारी खटला रद्द करण्यास नकार देताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण केले.
यावेळी न्यायालयाने शुद्धीकरण, पंचगव्याची तपश्चर्या, दूध, दही, लोणी, मूत्र आणि शेण या पाच उत्पादनांमध्ये गायींचे महत्त्व नमूद केले. तसेच हिंदू धर्माच्या ग्रंथांच्या आधारे निर्माता ब्रह्मदेवाने एकाच वेळी पुजारी आणि गायींना जीवन दिले जेणेकरून पुजारी धार्मिक ग्रंथांचे पठण करू शकतील आणि गायींना धार्मिक विधींमध्ये 'तूप' देऊ शकेल, असे त्यात म्हटले आहे.
यावेळी त्यांनी हिंदू देवी देवतांचा गायींशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. न्यायालयाने म्हटले आहे, भगवान शिवाचे वाहन नंदी हा एक बैल आहे. इंद्र देवाचा कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करणा-या गायीशी जवळचा संबंध आहे. तर भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या तारुण्यात गोरक्षक होते. गायीला हिंदू धर्मातील सर्व प्राण्यांमध्ये सर्वात पवित्र मानले गेले आहे. तिला कामधेनू किंवा दैवी गाय संबोधले जाते कारण सर्व इच्छांची दाता म्हणून तिला ओळखले जाते. असे न्यायालयाने म्हटले आहे.
यावेळी उच्च न्यायालयाने अन्य दाखले देताना म्हटले आहे की गायीची उत्पत्ती ही हिंदू धर्मानुसार समुद्रमंथनातून झाली आहे. देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनादरम्यान क्षीरसागरातून ती बाहेर पडली आहे. हिंदू धर्म असे मानते की तिचे चार पाय वेदांचे प्रतीक आहेत, दूधाचे स्रोत धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ आहेत. तिची शिंगे देवतांचे प्रतीक आहेत, चेहरा सूर्य आणि चंद्र आहे. तिचे खांदे अग्नी किंवा अग्नीची देवता आहे. तिचे वर्णन नंदा, सुनंदा, सुरभी, सुशीला आणि सुमना अशा रुपांमध्येही केले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
असे सर्व दाखले देत न्यायमूर्ती अहमद यांनी म्हटले आहे की, हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या दाखल्यांवरून गाईंच्या कत्तलीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असल्याने, सर्व धर्मांचा आदर करणे महत्त्वाचे आहे, ज्यात हिंदू धर्माचा विश्वास आहे की गायीचे संरक्षण आणि आदर केला पाहिजे कारण ती दैवी आणि नैसर्गिक हिताचे प्रतिनिधित्व करते, अशी टिप्पणी करत त्यांनी गोहत्येचा आरोप असलेल्या मोहम्मद अब्दुल खालिक यांच्यावरील फौजदारी खटला रद्द करण्यास नकार दिला.
हे ही वाचा :