

पुढारी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी मोठे विधान केले आहे. मंदी टाळण्यात आपण बहुतेक यशस्वी ठरलेलो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच २०२३ला एकूण जागतिक आर्थिक विकासात भारताचा वाटा हा १५ टक्के इतका मोठा राहणार आहे, असे कौतुकही त्यांनी केले आहे. भारतातील परस्पर सहाकार्याचे वातावरण आणि एकवाक्यता याबद्दल त्यांनी भारताची स्तुती केलेली आहे. २०२३ हे वर्ष आव्हानात्मक असेल असेही त्या म्हणाल्या.
जॉर्जिवा G20च्या बैठकीसाठी सध्या बंगळुरूमध्ये आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल महत्त्वाचे मत नोंदवले आहे.
"मंदी टळेल असे दिसते. युरोप नैसर्गिक वायू आणि कच्चा तेलासाठी रशियावर अवलंबून होता, पण यातून युरोपने तातडीने मार्ग काढला. तसेच चीनमधील अर्थव्यवस्था कोरोनानंतर खुली झालेली आहे. तर जागतिक आर्थिक विकासात भारत १५ टक्के इतका वाटा उचलेल, असे चित्र आहे."
G20 मधील कर्जावर अवलंबून असलेल्या देशांसाठी आम्ही आमच्यातील मतभेद दूर करण्यासाठी कटिबद्ध आहोत. जागतिक आर्थिक संरचनेतील तफावत दूर होण्यासाठी मात्र राजकीय सहमती आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा