Harry Brook : सचिन, विराटला जमलं नाही ते हॅरी ब्रुकने करून दाखवले! जाणून घ्‍या नवा विश्‍वविक्रम | पुढारी

Harry Brook : सचिन, विराटला जमलं नाही ते हॅरी ब्रुकने करून दाखवले! जाणून घ्‍या नवा विश्‍वविक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : गॉड ऑफ क्रिकेट अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांनी क्रिकेट विश्वातील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र या दोघां दिग्‍गज फलंदाजांनाही जमली नाही अशी कामगिरी  इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रूक याने आपल्‍या नावावर केली आहे. कसोटीच्या पहिल्या ९ डावात सर्वाधिक धावा करण्‍याचा विश्‍वविक्रम त्‍याने आपल्‍या नावावर केला आहे. आपल्या आक्रमक आणि शानदार फलंदाजीमुळे हॅरी ब्रुक याने जागतिक क्रिकेटचं लक्ष वेधून घेतले आहे. (Harry Brook)
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत हॅरी ब्रूक शानदार कामगिरी करत आहे. कसोटी क्रिकेटच्या पहिल्या ९ डावात ८०७ धावा करून ब्रूकने असा विक्रम केला आहे जो सचिन आणि विराटलाही करता आला नव्हता. हा विक्रम करताना त्याने भारताचा माजी  क्रिकेटपटू विनोद कांबळी यालाही मागे टाकले आहे.  (Harry Brook)

विनोद कांबळीच्‍या नावावर होता विक्रम

कसोटी क्रिकेटच्‍या पहिल्‍या ९ डावात सर्वाधिक ७९८ धावा करण्‍याचा विक्रम सचिन तेंडुलकरचा चांगला मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांच्या नावावर होता. यामध्‍ये कांबळीच्‍या  2 द्विशतके आणि 2  शतकांचा समावेश आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या वेलिंग्टन कसोटीत हॅरीने १८४  धावांची खेळी केली. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीही ठरली आहे. यादरम्यान, स्टार इंग्लिश क्रिकेटरची सरासरीही 100.88 होती.
हॅरी ब्रूकने आतापर्यंत ९ कसोटी डावांमध्ये ४ शतके आणि 3 शतके झळकावली आहेत. गेल्या ५ कसोटी सामन्यांमधील त्याचे हे चौथे शतक आहे. जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशस मालिका खेळवली जाणार आहे. अशा स्थितीत भारत दौऱ्यावर 2 कसोटी सामने गमावलेल्या कांगारू संघासाठीही ब्रूक धोक्याची घंटा ठरू शकतो.

कसोटीच्‍या पहिल्‍या ९ डावात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

1)  हॅरी ब्रुक – 807 धावा
2)  विनोद कांबळी – 798 धावा
3 ) हर्बर्ट सटक्लिफ – 780
4 ) सुनील गावस्कर – 778
5 ) एव्हर्टन वीक्स -777
हेही वाचा :

Back to top button