Netflix Subscription : ‘नेटफ्लिक्स’ ३० देशांत झाले स्वस्त! जाणून घ्या भारतीयांनाही होणार का फायदा?

Netflix Subscription : ‘नेटफ्लिक्स’ ३० देशांत झाले स्वस्त! जाणून घ्या भारतीयांनाही होणार का फायदा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेटफ्लिक्सने ३० पेक्षा जास्त देशांमध्ये सब्सक्रिप्शनचे दर कमी केले आहेत. ज्या देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या दरात घट करण्यात आली आहे, त्यामध्ये बहुसंख्य मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे. इराण, लिबिया, जॉर्डन आणि यमनसह युरोपीय देश क्रोएशिया, स्लोवेनिया, बल्गेरिया, मलेशिया , इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि लॅटिन अमेरिका या देशांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, अमेरिका, कॅनडा आणि अनेक युरोपीय देशांमध्ये नेटफ्लिक्सने आपले सब्सक्रिप्शन दर जैसे थे ठेवले आहेत.

दर कमी करत अधिक लोकांना आकर्षिक करण्यासाठी नेटफ्लिक्सकडून हे धोरण राबवले जात आहे. नेटफ्लिक्सने मलेशियामध्ये आपल्या सोशल मीडियावर ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये कंपनीने म्हटले की,  आजपासून आमची मलेशियामधील मूळ योजना आता नवीन सदस्यांसाठी 28 RM आहे. यापूर्वी या प्लॅनची ​​किंमत RM 35 प्रति महिना म्हणजेच अंदाजे 653 रुपये होती.

भारतीयांनाही होणार का फायदा?

नेटफ्लिक्सने भारतात[y सबस्क्रिप्शनच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. गेल्यावर्षी नेटफ्लिक्सने भारतातील मासिक सदस्यता योजनांच्या किंमती १८ टक्‍क्‍यांहून आणि ६०.१ टक्‍के पर्यंत कमी केल्या होत्‍या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news