McKinsey layoffs : मॅकॅन्सी कंपनीत नोकर कपात; २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ! | पुढारी

McKinsey layoffs : मॅकॅन्सी कंपनीत नोकर कपात; २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या टाळेबंदीची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. आता या यादीत आणखी एक ग्लोबल कन्सल्टिंग फर्म मॅकॅन्सीचाही नाव जोडले गेले आहे. मॅकॅन्सी सुमारे दोन हजार नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार ग्राहकांशी थेट संपर्क न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची ही टांगती तलवार आहे.

मॅकॅन्सीमध्ये सध्या एकूण ४५ हजार लोक काम करतात. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार यापैकी दोन हजार जणांना कामावरून कमी केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, कंपनीने गेल्या काही वर्षांत प्रचंड नोकर भरती केली आहे. पाच वर्षांपूर्वी एकुण सुमारे २८ हजार कर्मचारी काम करत होते. तर २०१२ मध्ये केवळ १७ हजार कर्मचारी होते. सध्या ४५ हजार एवढे कर्मचारी आहेत. कंपनीच्या ग्राहकांसाठी टीमची नव्याने रचना करत आहोत, यामुळे कंपनीचे काम अधिक चांगले होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कंपनी अजूनही ग्राहकांशी व्यवहार करणाऱ्या लोकांना भरती करत आहे आणि भविष्यातही करत राहील, असेही कंपनीने म्हटले आहे.

मॅकॅन्सी व्यतिरिक्त इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, अॅमेझॉन, डिस्ने यांसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय भारतातील अनेक स्टार्टअप कंपन्याही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. अलीकडेच, बंगळूरस्थित स्टार्टअप कंपनी मायगेटने ३० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

हेही वाचा : 

Back to top button